Table of Contents
हे ही वाचा
शाहरुख खानचा “जवान” चित्रपट दाखवतो आरसा आणि आसमान एकाच वेळी !
निपाह व्हायरस बद्दल थोडक्यात
निपाह विषाणू काय आहे ?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार
निपाह संसर्गाची लक्षणे काय ?
निपाह वायरस वर लस उपलब्ध आहे ?
रोगाची गंभीरता
निपाह रोगावर उपाय योजना
निपाह व्हायरस मुळे केरळ मध्ये 2 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.या दोन्ही व्यक्ती फुजीकोट येथील असल्याचे बोलले जात आहे.याबरोबरच आणखी 4 लोकांना संसर्ग झाल्याची बातमी समोर आली आहे.या 2 मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत.याठिकाणी केंद्र शासनाने तपासणीसाठी डॉक्टरांची टीम पाठवली आहे. देशाच्या विविध राज्यात याबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज आपण निपाह व्ह्ययरस बाबत काही माहिती या ठिकाणी पाहणार आहोत.
हे ही वाचा
नाशिक गौरव 2023 : भव्य जिल्हास्तरीय नृत्य,समुहनृत्य व गायन स्पर्धा.
निपाह विषाणू हा आर एन ए विषाणू आहे. हा “विषाणू ” पॉरमॅक्सोवाइरीडे कुटुंबाचा एक भाग आहे. हा प्रथमत: 1998 आणि 1999 मध्ये मलेशियन व सिंगापूर मधील डुकरांना होऊन एनंसेफेलीटीक रोगांमध्ये गंभीर श्वसन रोगाला बळी पडलेल्या मनुष्य नंतर प्रथम झोनेटिक रोगकारक म्हणून ओळखला गेला.
झोनोटिक हा रोग प्रकार प्राणी व मनुष्य दोघांमध्ये आढळून येतो. झोनेटिक हा शब्द झोरासिस या शब्दाशी संबंधित आहे . झोनोसिस म्हणजे माणसांना प्राण्यांपासून होणारे रोग.हा रोग मुळत: प्राणांमध्ये असून ज्याची लक्षणे माणसांत देखील निर्माण होऊ शकतात.निपाह विषाणू फळांच्या वटवाघुळात मुख्यत्वे आढळतो. ‘फळांचे वटवाघुळ’ म्हणजे असे वटवाघुळ जी फळे खातात त्यांनाच फळांचे वटवाघुळ असे म्हणतात . ही वटवाघुळे पेट्रोपॉडिडी परिवारात समाविष्ट आहेत. निपाह विषाणू हा हेद्राच्या विषाणूशी संबंधित आहे व हे दोन्ही विषाणू निपाह व्हायरसचे सदस्य म्हणून ओळखले जातात . निपाह विषाणू हा वटवाघुळाची विष्ठा, लघवी , व लाळ इत्यादी त आढळून येतो. हा विषाणू मनुष्य ते मनुष्य देखील पसरू शकतो.मानवासाठी काळजी घेणे हेच महत्वाचे असणार आहे.
निपाह विषाणू काय आहे ?
जागतिक आरोग्य संघटनेच्या 10 प्रमुख जीव घेण्या आजारांच्या यादीत निपाह व्हायरस चा समावेश आहे.
तज्ञ सांगतात ,’निपाह व्हायरस संसर्ग झालेल्या रुग्णांची मृत्यू होण्याची शक्यता 40 ते 70 टक्के असल्याचा आढळून आले आहे. WHO च्या माहितीनुसार , निपाह एक झोनेटिक व्हायरसचा प्रकार आहे. याचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांमध्ये लक्षण दिसून येत नाहीत .मात्र काही रुग्णांमध्ये फुफुसांमध्ये गंभीर स्वरूपाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
हे ही वाचा
मोबाईल वर निर्बंध आता नाशिक मनपा शाळांमध्ये ! परिपत्रक जारी.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार
‘ निपाह ‘व्हायरस चा संसर्ग वटवाघुळ आणि डुकरांपासून माणसांना होतो.
एक संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असते.
फ्रुट बॅट्स म्हणजे फळ खाणारी वटवाघुळ निपाह व्हायरसचे नैसर्गिक वाहक असतात.
वटवाघुळ संशोधक डॉक्टर महेश गायकवाड सांगतात , “निपाह व्हायरस वटवाघुळ यांच्या लाळेमध्ये असतो . वटवाघुळ आणि खाल्लेली उष्टी फळ माणसांनी खाल्ली तर ,व्हायरस आपल्या शरीरात जातो , त्यामुळे झाडाखाली पडलेली उष्टी फळ खाऊ नयेत “.
निपाह संसर्गाची लक्षणे काय?
ताप , डोकेदुखी , कफ ,घसादुखी आणि श्वास घेण्यात अडथळा ही निपाह संसर्गाची लक्षणे आहेत.
तज्ञांच्या माहितीनुसार,काही रुग्णांमध्ये निमोनिया आणि मेंदूला सूज येणे शक्यता असते.
निपाहचा विषाणू शरीरात गेल्यानंतर लक्षणे दिसून येण्यासाठी 4 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो . RT-PCR टेस्ट करून निपाह व्हायरस संसर्गाची निदान करण्यात येतं.
हे ही वाचा
“आमच्या पप्पांनी गणपती आणलाय”.फेमस छोटा स्टार चिमुकला कोण आहे ?
निपाह वायरस वर लस उपलब्ध आहे ?
तज्ञांच्या माहितीनुसार, निपाह व्हायरस वर सद्यस्थितीत कोणतीही ठोस उपचार पद्धत किंवा लस उपलब्ध नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार ,निपाह चा संसर्ग झालेल्या रुग्णांवर.सपोर्टीव्ह केअर च्या मदतीने उपचार केला जातो.
रोगाची गंभीरता
या रोगावर कोणतेही ठोस अशी औषधे किंवा लस ही उपलब्ध नाही . त्यामुळे ताप मेंदूपर्यंत पोहोचल्यावर रुग्ण कोमात जाऊन दगावतो. संसर्ग झाल्याचे ध्यानात येताच रुग्णाला अति दक्षता विभागात ठेवले जाते.
निपाह रोगावर उपाय योजना
निपाह रोग होऊ नये म्हणून काय करावे, निपाह आजारापासून बचाव कसा करावा याची माहिती खाली दिली आहे.
पक्षी किंवा प्राण्यांनी अर्धवट खाऊन टाकलेली फळे खाणे टाळावे.
झाडावरून खाली पडलेली फळे खाणे टाळावे.
संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा निपाहच्या संसर्ग झालेल्या माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळावे.
कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस खाणे टाळावे.
पाणी उकळून प्यावे, विहिरीवर जाळी बसवून वटवाघुळे किंवा इतर पक्षांना रोखावे.
आजारी व्यक्तींना भेटायला जाणे शक्यतो टाळावे किंवा अशावेळी मास्क ग्लोव्हस यांचा वापर करावा.
तुम्हाला इंफेक्टेड भागात फिरताना अस्वस्थ वाटत असल्यास किंवा ताप ,अंग दुखी ,चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घ्या.
हे ही वाचा
30 मिनिटात 1 हेक्टर जमीन मोजणी आता शक्य !
वैद्यकीय मदत करणाऱ्या व्यक्तींनीही रुग्णावर उपचार करताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. सोबतच ग्लोव्हज , मास्क घालून रुग्णांची तपासणी करावी विशेषत: डॉक्टर नर्स व रुग्णांची सेवा करणाऱ्या व्यक्तीने विशेष काळजी घ्यावी.अशाप्रकारे दक्षिण भारतात या रोगाने डोके वर काढले आहे.सर्वांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680