Table of Contents
पाणीपुरी मशीन : छोट्या उद्योगातून जास्त नफा.
४० रुपये ला १०० पाणीपुरी येतात.आपण विकत घेतो तेव्हा विक्रेता ४ किंवा ६ पाणीपुरी देतो.तर नफ्याचे प्रमाण किती झाले ?.आपण पाहतो पाणीपुरी विकणारे राजस्थानी आहेत,बिहारी आहेत,उत्तर प्रदेशवाले आहेत. पण मराठी माणूस कुठेच दिसत नाही.इतका फायदेशीर व्यवसाय मराठी माणूस का दूर आहे हेच कळत नाही. सध्याच्या युगात रोजगाराच्या संधी खूप कमी प्रमाणात आहेत, त्यामुळे मनुष्याचे जगणे खूप अवघड झाले आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात चटपटीत पदार्थांकडे मनुष्याचा कल जास्त वाढत आहे.
हे ही वाचा
निपाह व्हायरस ची दहशत : निपाह संपुर्ण माहिती.देशात अलर्ट
भारताच्या कानाकोपऱ्यात पाणीपुरी व्यवसाय वाढत आहे.त्यामुळे पाणीपुरी हा व्यवसाय छोटा जरी असला तरी त्यातून जास्त नफा मिळवून देणार हा व्यवसाय आहे.
आपला देश विविधतेने नटलेला असल्यामुळे पाणीपुरीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.लोकांची बघता बघता पाणीपुरीसाठी खूप मागणी वाढली आहे आणि प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये ही पाणीपुरी खूप प्रसिद्ध आहे.लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी पाणीपुरी आहे. मोठ्या उद्योग धंद्यातूनच जास्त पैसे कमवता येतात असे नसते, छोट्या उद्योगधंद्यातूनही खूप काही कमावता येते.
आज आपण माहिती घेत आहोत पाणीपुरी मशीनची.पारंपारिक पाणीपुरी अधिक मसालेदार आणि चवदार बनवण्याबरोबरच ग्राहकाला विविध प्रकारचे फ्लेवर निवडण्याचे स्वातंत्र्य देणे हा या मशीनचा उद्देश आहे .बंगळुरू शहरात दोन ठिकाणी ही मशीन सुरू केली आहे.अहमदाबाद मधील पाणीपुरी विकणाऱ्या वॉटर शॉट्स या कंपनीने ही मशीन विकसित केली आहे. सन 2018 मध्ये भारतातील पहिली पाणीपुरी मशीन अहमदाबाद मध्ये सुरू करण्यात आली आहे. ही मशीन कुठेही घेऊन जाता येते यात्रेमध्ये.
बाजारामध्ये घेऊन जाणे सहज सोपे आहे.अलीकडे महाराष्ट्रातील सानिका सोडा फौंटन कंपनीचे मालक अमोल सानप यांनी पाणीपुरी मशीन विषयी माहिती सांगितली.वरील कंपनी सांगितलेली वेगळी असू शकते.सानिका सोडा फौंटन कंपनीचे मालक अमोल सानप यांनी पाणीपुरी मशीन विषयी माहिती सांगितली ती वेगळी असू शकते.अमोल सानप यांचा संपर्क न ही खाली देत आहोत.
हे ही वाचा
नाशिक महानगरपालिके मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची थोडक्यात माहिती.
पाणीपुरी मशीन वैशिष्ट्ये
या मशीनची किंमत 35 हजार पासून पुढे आहे. यात कंटेनर आहेत. एकात गोड पाणी तर दुसऱ्या कंटेनरमध्ये तिखट पाणी. गोड पाणी हवे असल्यास गोड साठीचे असलेले बटन दाबायचे. तिखट पाणी हवे असल्यास तिखट साठीचे बटन दाबायचे. हवी त्या चवीची पाणीपुरी मिळते.
पाणीपुरी देताना विक्रेता स्वच्छता राखत नाही असे म्हटले जात होते. मात्र या मशीन ने ही चिंता मिटवून टाकली आहे .हे मशीन खरेदी करून पाणीपुरी व्यवसाय केल्यास शुद्धतेची हमी मिळते. मशीन चा वेग जास्त असल्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त नफा मिळवू शकतो.
फायदे :
पाणीपुरी व्यवसायामध्ये 4000 पाणीपुरी बनवून 800 रुपये नफा कमवू शकता अशा प्रकारे कमी कष्टात जास्त नफा मिळू शकतो . दिवसाचे आठ तास काम करून सुमारे सहा हजार रुपये कमवू शकतो .मात्र या मशीनला लाईट बिल ,भाडे ,द्यावे लागत नाही. नगरपालिकेची पावती तेवढी घेतली की व्यवसाय कुठेही करू शकतो. या व्यवसायामुळे रोजगार निर्मिती देखील होऊ शकते.या व्यवसायातून पन्नास ते साठ हजार रुपये महिना नफा कमवला जातो.
हे ही
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेबाबत संपुर्ण माहिती जाणून घ्या
छोट्या उद्योगधंद्यातून जास्त नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. शिवाय मनुष्यबळ कमी प्रमाणात लागते.त्यामुळे प्रत्येकाने छोटा उद्योग का असेना त्यातून जास्त नफा कसा कमवता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा .कमी गुंतवणूक मध्ये चालणार व्यवसाय आहे. छोट्या छोट्या उद्योगधंद्यातूनच मनुष्य जास्त नफा मिळवू लागला आहे.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680