Paytm FASTag : डीऍक्टिव्हेट कसे करावे ? या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
RBI ने 31 जानेवारी 2024 रोजी Paytm बँके विषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने 29 फेब्रुवारी नंतर वॉलेट, FASTag ग्राहक खात्यावर जमा किंवा टॉप अप इत्यादी स्विकारायला मनाई केली आहे.
आता तुम्हाला paytm वरून तुमचे FASTag देखील रिचार्ज करता येणार नाही. सर्वांना 31 जानेवारी पर्यंत KYC अपडेट करायची मुदत होती पण ज्यांनी KYC अपडेट केली नाही त्यांना paytm वर आता FASTag चा वापर करता येणार नाही, म्हणून वापरकर्त्यांनी लवकरच paytm डीऍक्टिव्हेट करावे.
हे ही वाचा: Mahindra : महिंद्राची 6-सीटर व्हेरिएंटमध्ये आली नवीन कार | कमी किमतीत
FASTag म्हणजे काय?
FASTag ही NHAI द्वारे चालवली जाणारी भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम आहे. FASTag टोल बुथवर पेमेंट करण्यासाठी प्रीपेड वॉलेट द्वारे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करत असते. सध्या FASTag ची आवश्यकता बघून तुमच्या सर्व Four Wheeler गाड्यांवर विंडशील्डवर FASTag असणे ही आवश्यक आहे.
Paytm FASTag कसे डीऍक्टिव्हेट करावे?
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये paytm ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे.
त्यानंतर तुम्ही तुमचे क्रेडेन्शियल वापरून लॉग इन करा.
सर्च बारवर जाऊन FASTag टाईप करा आणि पुढे ‘services’ या विभागात जाऊन तेथे ‘manage FASTag’ वर टॅप करा.
मोबाईल स्क्रीनवर एक पेज येईल तेथे तुम्हाला तुमच्या paytm नंबरशी सक्रिय असणारी FASTag खाती दिसणार आहेत.
यापुढे मेजर खाली तुम्हाला Help आणि support या ऑप्शन वर क्लिक करावे लागणार आहे.
आता ‘Need help with non-order related quiries’? यावर टॅप करून ‘Quries related to updating FASTag profit’ ऑप्शन वर क्लिक करा.
आता तुम्हांला खाली ‘I want to close my FASTag’ हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो करावे लागणार आहेत.
अशाप्रकारे तुम्हाला तुमचे paytm FASTag सोप्या पद्धतीने डीऍक्टिव्हेट करता येणार आहे.
हे ही वाचा: PM Kisan maandhan Yojana : सरकारची खास योजना.
29 फेब्रुवारी नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यावर वॉलेट, FASTag, NCMC इत्यादी कोणत्याही व्याज, कॅशबॅक किंवा टॉप-अप परवानगी दिली जाणार नाही. व्याज, कॅशबॅक हे कधीही जमा केले जाऊ शकते असे RBI द्वारे एका निवेदनात सांगण्यात आले आहे म्हणून याविषयी विशेष काळजी घ्यावी.
Paytm चे स्पष्टीकरण
2 वर्षांपासून paytm हे इतर कंपनींना मदत करत आहे. याकडे कंपनी विशेष लक्ष देत आहे. याला अनुसरून कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, वापरकर्त्यांना FASTag सेवा ही सुरू ठेवता येणार आहे. या सर्व गोष्टी कंपनीने अधिकृत ट्विटर अकाउंट च्या माध्यमातून या संदर्भात प्रत्युत्तर देखील दिले आहे. https://twitter.com/Paytm/status/1752953905993130066
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680