आपल्याला सगळ्यांना माहित आहे जग खुप वेगवान झालं आहे आणि या वेगवान जगाबरोबर राहण्यासाठी आपली सर्वांची जीवनशैली बदलली आहे. प्राचीन काळ ते आधुनिक काळ यांचा जर विचार केला तर जमीन असमानचा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. पूर्वीचे खडतर जीवन आज गरिबातील गरीब लोकांचे सुद्धा राहिलेले नसुन ते सुखद झालेले आहे असे दिसून येते.प्राचीन काळी सहा महिने लागायचे एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी त्याच ठिकाणी जाण्यासाठी आज सहा तास पुरेशे आहेत, हे इतके अंतर कसे काय वाचले तर ते आहे दळणवळणामध्ये झालेल्या क्रांतिकारी बदलामुळे !
सुकन्या समृद्धी योजना काय आहे संपुर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
म्हणजेच सहा महिने वजा सहा तास केले तर जे बरोबर उत्तर येईल ते उत्तर म्हणजे सुखी जीवन किंवा आरामदायी जीवन असेच ठरेल. जेवढे आरामदायी जीवन तेवढे आरोग्याला घातक,हे साधं गणित आहे. आरामदायी जीवनाचे साथी कोण आहेत असे विचारले तर रक्तदाब,मधुमेह अजुनही बऱ्याच व्याधी तयार झालेल्या आहेत,ज्या सुखी जीवनामुळे आरामदायी जीवनामुळे उद्भवत आहेत. “संघर्ष” म्हणजे मानवाला शारीरिक ,मानसिक आणि बौद्धिक सर्व बाबतीत गुंतवून ठेवते.
आरोग्यावर हा व्हिडीओ पहा : क्लिक करा
संघर्ष असला की विचार फक्त ध्येयाचा होतो. संघर्ष असला की शारीरिक तर आपण गुंतून राहतोच पण बौद्धिक सुद्धा गुंतून राहतो. एक संघर्ष फक्त मानवाला शारीरिक,मानसिक,बौद्धिक या तिन्ही गोष्टींना साचेबंद करतो, परिणामी आपले आरोग्य चांगले राहते. आज प्रत्येक जण सुख मिळवण्याच्या मागे धावतो असे दिसते पण प्रत्येक जण जोपर्यंत सुख मिळत नाही तोपर्यंत निरोगी राहतो आणि सुख मिळाल्यावर मात्र त्याचे आरोग्य बिघडायला सुरुवात होते.
आरोग्य ही शारीरिक,मानसिक असे दोन प्रकारचे असते ही दोन्ही आरोग्य खुप महत्त्वाचे आहेत. ती एकमेकांवर अवलंबून असतात. शारीरिक आरोग्य बिघडले की मानसिक आरोग्य बिघडते. तुम्ही कधीतरी पाहिले असेल की आजारी माणसे खुप चिडचिड करत असतात. शरीराला जो त्रास होतो त्याचा राग ते दुसऱ्यावर खेकसून व्यक्त करत असतात. दुसरी गोष्ट अशी की, एखाद्याचे मानसिक आरोग्य बिघडले की शारीरिक व्याधी वाढत जातात. या दोन गोष्टींचा समतोल राखणे शहरी लोकांच्या तारेवरील कसरत असते,परंतु ग्रामीण भागातील परिस्थिती ही शहरी भागापेक्षा वेगळी आहे.
शहरातील काही सुविधा जरी खेड्यापर्यंत पोहोचल्या असल्या तरी ग्रामीण भागात म्हणावे तितके आरामदायी जीवन नाही असे अजुनही वाटते. त्याचे कारण, म्हणजे आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि देशातील बहुतांश लोकसंख्या ही खेड्यामध्येच राहते म्हणून महात्मा गांधीजी म्हणाले होते खेड्याकडे चला ! शेतीवर आधारित उद्योग भारतात जास्त आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने इथे लोक किती जरी यांत्रिक पद्धतीने शेती करताना आपल्याला दिसत असले तरी प्रत्यक्ष त्या मातीशी आणि जमिनीतील कष्टाशी त्यांचा संबंध येतोच. आज शेती परवडत नाही ही ओरड सगळीकडे दिसते ऐकायला येते त्याचे कारण म्हणजे शेतीत कष्ट करण्यासाठी शेतकऱ्याकडे मनुष्यबळाची कमतरता दिसून येते. त्यामुळे काही शेतकरी स्वतःच्या शेतीत रोजगारी मजूर न लावता स्वतःच कष्ट करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. आता तुम्ही म्हणाल शारीरिक आरोग्य चांगले राहते मग मानसिक आरोग्याचे काय ?
आपणास माहित आहे ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा या मर्यादित असतात. जेवढ्या मर्यादित गरजा तेवढी हाव कमी.आहे त्यातच समाधान मानण्याची प्रवृत्ती गावाकडे दिसुन येते. शहरी लोक स्टेटसला महत्त्व जास्त देतात. ग्रामीण भागात या गोष्टींना महत्त्व कमी दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात फक्त पैशाच्याच मागे धावणारे लोक कमी आहेत. शहरी लोकांना उच्च गुणवत्तेचे अन्न,वस्त्र,निवारा शिक्षण याची गरज असते. पण ग्रामीण लोकांना प्राप्त परिस्थितीत मिळणारा अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण जे मिळेल ते त्यांना चालते. त्यामुळे या लोकांची विचारसरणी शहरी लोकांच्या विचारसरणीपेक्षा वेगळी आहे.
त्यामुळे त्यांचे दोन्ही प्रकारचे आरोग्य चांगले राहते,परंतु सर्वच लोक असे असतील असे मी हमीपूर्वक नाही सांगु शकत, परंतु बहुतांश लोक मात्र शहरी लोकांपेक्षा निरोगी मात्र असल्याचे पाहायला मिळते. ते दैनंदिन जीवनात आरोग्य जगत असतात. शहरी लोक मात्र आरोग्य मिळवण्यासाठी नाना तऱ्हेने प्रयत्न करत असतात. शहरी लोकांना जाणीवपुर्वक योगा,व्यायाम करावा लागतो, पण ग्रामीण लोकांना मात्र त्यांचा व्यायाम, योगा दिवसभरात कधी होऊन गेला हे त्यांना कळलेले ही नसते म्हणूनच वाटते शहरी लोक जे जाणीवपूर्वक करतात, तेच ग्रामीण लोक कळत नकळत करत असतात. म्हणजेच ते आरोग्य जगत असतात.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680