PM Kisan maandhan Yojana : सरकारची खास योजना या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
प्रत्येक व्यक्तीचा वार्धक्य काळ हा असा काळ असतो जेव्हा तो उत्पन्न मिळवू शकत नाही. उत्पन्न नसल्यामुळे अशा स्थितीत अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीत वास्तव समस्या शेतकऱ्यांच्या जीवनात येतात. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना राबवलेली आहे. PM किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वृद्ध काळात दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळते.
हे ही वाचा: Navbharat Literacy Mission : नवभारत साक्षरता अभियान मूल्यांकन बाबत महत्त्वाची माहिती
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पीएम किसान मानधन योजना (PM Kisan maandhan Yojana) राबवलेली आहे. ही योजना खास करून शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. पीएम किसान मानधन योजनेमार्फत वय वर्ष 60 नंतर शेतकऱ्यांना पेन्शनचा लाभ घेता येणार आहे.

PM किसान मानधन योजना (PM Kisan maandhan Yojana) थोडक्यात.
केंद्र सरकार द्वारे अनेक योजना व उपक्रम राबवले जातात. त्यातलीच एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना होय. पी एम किसान मानधन योजनेसाठी शेतकरी किंवा असंघटित कामे करणारी व्यक्ती अर्ज भरू शकतो, या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेसाठी अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय 40 वर्ष असायला हवे. प्रत्येक अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असायला हवे. या योजनेत विशेष गुंतवणूक करून अर्जदाराला पेन्शनचा लाभ घेता येतो.
हे ही वाचा: तुमच्या Aadhar Card चा वापर दुसरे कोणी करत नसेल ना ? मोबाईलमध्ये असे तपासा
गुंतवणूक कशी करावी ?
PM किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटर वर जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकता किंवा तुम्ही घरी बसूनही सरकारी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी नोंदणी करू शकता.अशा प्रकारे तुम्ही या लिंक वर https://maandhan.in/ योजनेसाठी नोंदणी करू शकतात.
हे ही वाचा: Vitamin D मिळवण्याचे 8 स्त्रोत्त आणि महत्त्वाचे Useful फायदे
PM किसान मानधन योजनेद्वारे पेन्शन कशी मिळवायची
या योजनेसाठी अर्जदाराला वयोगटात प्रमाणे गुंतवणूक करावी लागते. अर्जदार अठरा वर्षाचा असेल तर त्याला दर महिन्याला 95 रुपये जमा करावे लागतात. अर्जदार हा 40 वर्षाचा असेल तर तेव्हा त्याला दर महिन्याला दोनशे रुपये जमा करावे लागतात. अशा प्रकारे 60 वर्षानंतर अर्जदाराला प्रत्येकी 3000 रुपये महिना पेन्शन मिळणार आहे, म्हणजेच 36 हजार रुपये पेन्शन एका वर्षाला मिळू शकते.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680