PM Suryoday Yojana : काय आहे ही योजना ? जाणून घ्या

PM Suryoday Yojana : काय आहे ही योजना ? जाणून घ्या या विषयी सविस्तर महिती.

केंद्र सरकार द्वारे एक नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे ती योजना म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजना (PM Suryoday Yojana). या योजनेअंतर्गत एक कोटी लोकांना त्यांच्या घरावर पैसे खर्च न करता सोलर पॅनल बनवून दिले जाणार आहे. अनुदान सरकार करणार आहे.

सबसिडी 60 टक्के मिळणार

लोकांना पहिले घरावर सोलर पॅनल बसवायचे असेल तर त्यांना 40% सबसिडी मिळायची पण या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना 60% सबसिडी मिळणार असून त्याचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थ्यांना बाकीचे 40% रक्कम ही कर्ज स्वरूपात घेता येणार आहे.

हे ही वाचा: TRAI DND 3.0 (Do Not Disturb) install करा आणि अनोळखी कॉल किंवा मेसेज पासून सुटका मिळवा |

या लाभार्थ्यांना मिळणार लाभ

सरकारच्या दृष्टीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांना याचा लाभ घेता यावा म्हणून ते प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकार द्वारे या योजनेअंतर्गत एक कोटी घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले जाणार आहे. सरकारने 80 टक्के एवजी 60 टक्के सबसिडी केली आहे. 20% सबसिडी वाढवण्याचे कारण म्हणजे लोकांना कमी करतात या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या घराचे विज बिल 300 युनिट पेक्षा कमी येते त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कर्ज फेडण्यासाठी ही मुभा

या योजनेत कर्ज घेणाऱ्या कोणत्याही लाभार्थ्यावर सरकारद्वारे कोणतेच दबाव निर्माण केले जाणार नाही आणि केंद्र सरकार प्रत्येक राज्यासाठी एसपीव्ही देखील बनवणार आहे. लाभार्थ्याला 60% सबसिडी आणि 40% टक्के एसपीव्ही द्वारे कर्ज मिळवता येणार आहे. एसपीव्ही मुळे अतिरिक्त निर्माण होणारी वीज खरेदी केली जाणार आहे यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला कर्ज फेडण्यास मदत मिळेल.

हे ही वाचा: Mahindra : महिंद्राची 6-सीटर व्हेरिएंटमध्ये आली नवीन कार | कमी किमतीत

अर्थसंकल्पात किती तरतूद

या योजनेविषयी सर्वप्रथम नरेंद्र मोदींनी राम मंदिर उद्घाटनानंतर सांगितले होते. याबरोबरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना देखील या योजनेविषयी काही बाबी सांगितल्या होत्या. यात त्यांनी सांगितले की, या योजनेसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, लाभार्थ्याला वर्षभरात 15 ते 18 हजार रुपयांची बचत होणार आहे.

हे ही वाचा: PM Kisan maandhan Yojana : सरकारची खास योजना.

सरकारची उद्दिष्टे काय?

केंद्र सरकारची ही योजना (PM Suryoday Yojana)राबवण्यामागचे एकच उद्देश आहे ते म्हणजे त्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून 100 गिगावॅट वीज निर्मिती करायची आहे. चालू आर्थिक वर्षात सौर ऊर्जेमुळे 35 गिगावॅट वीज निर्मिती झाली आहे.चालू आर्थिक वर्षात ७३ गिगावॅटपर्यंत वीज निर्मिती होण्याचा अंदाज आहे. या योजनेत 1 कोटी घरांवर छतांवर रुफटॉप सोलर पॅनल बसवले जाणार आहे. या (PM Suryoday Yojana) योजनेमुळे सरकारचे 100 गिगावॅट वीज निर्मितीचे लक्ष पूर्ण होणार आहे.

Leave a Comment