पुस्तक पेढी योजना बाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.
Table of Contents
प्राथमिक शाळेतील पुस्तक पेढीची उद्दिष्ठे ,पार्श्वभूमी, व व्याप्ती
प्राथमिक मराठी शाळेमध्ये सोयी असतात. गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शाळेमध्ये अनेक सवलती मिळतात परंतु,आजची नवी पिढी या प्राथमिक शाळांकडे फारशी ओढली जात नाही.
आपला मुलगा किंवा मुलगी यांना इंग्लिश मीडियम मध्ये पाठवतात ,पण प्राथमिक शाळा हीच त्या मुलांची पहिली पायरी असते हे कोणाच्या लक्षात येत नाही.मराठी प्राथमिक शाळेमध्ये आदिवासी जमाती,अनुसूचित जाती, दारिद्र रेषेखालील विद्यार्थ्यांना 1 ली ते 4 थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. .
आर्थिक अडचणीमुळे काही पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवत नाहीत. त्यामुळे पाल्याचे खूप नुकसान होऊ नये हे टाळणे असा या योजनेचा मुख्य हेतू आहे.Book Collection Scheme: Primary School and Secondary School
80% डिस्काउंट मिळवा ! अमेझॉन वर !!
आपल्या घरात दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंवर 80% डिस्काउंट ! आजच या लिंक वर क्लिक करा आणि मिळावा.
लिंक : https://amzn.to/3rwMc7b
या योजनेचा फक्त प्राथमिक शाळेतील म्हणजे 1 ली ते 4 थीच्या इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.शासकीय शाळेतील 1ली ते 4 थीच्या मुलांना फक्त या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही योजना संपूर्ण राज्यभरअस्तित्वात आहे.
1 ली ते 7 वीच्या शाळेमध्ये पाठ्यपुस्तके देण्याची व्यवस्था ही जिल्हा परिषद, महानगरपालिका मार्फत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तील पालकांसाठी पुस्तकाचे संच कर्जाऊ देण्याचे व्यवस्थापन करण्यात येते.
प्रत्येकी 3 वर्षांनी पुस्तक संच बदलण्याची आवश्यकता आहे.या योजनेमध्ये शैक्षणिक वर्ष संपत आल्यानंतर पुस्तक संच परत करायचे असतात.पुस्तक संचामध्ये लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण 25 पटसंख्या मर्यादित आहे .परंतु सन 2018- 2019 मध्ये 9 वी व 10 वीच्या पात्र लाभार्थ्यांना पाठ्यपुस्तक पुरवण्यासाठी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून प्राप्त झालेली मागणी बालभारतीकडे नोंदवण्यात आली नाही.
विद्यार्थ्यांना सन 2004 व 2005 पासून मोफत पाठ्यपुस्तके दिले जातात.
हे ही वाचा
Chat bot,PAT (महाराष्ट्र) यावर पायाभूत चाचणी गुण नोंद कशी कराल ?
माध्यमिक पुस्तक पेढी योजना
या योजनेमध्ये शैक्षणिक वर्षांनंतर दिलेला पुस्तक संच परत करायचे असतात.पुस्तक संचपुस्तकांच्या मध्ये लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण 25 पटसंख्या मर्यादित आहे परंतु सन 2018-2019 मध्ये 9 वी व 10वीच्या पात्र लाभार्थ्यांना पाठ्यपुस्तक पुरवण्यासाठी शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून प्राप्त झालेली मागणी बालभारतीकडे नोंदवण्यात आली नाही.
प्राथमिक पुस्तक पेढी योजनेचा उद्देश
डोंगराळ ग्रामीण आदिवासी जमाती भटक्या जाती अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती या जाती व जमातीमध्ये काही लोक आर्थिक दृष्ट्या खूप कमकुवत असतात त्यांच्याकडे पुस्तके घेण्यासाठी घेण्याइतपत सुद्धा पैसे नसतात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
हे ही वाचा
पाणीपुरी मशीन : मराठी उद्योजकाने बनवले, छोट्या उद्योगातून जास्त नफा !
माध्यमिक पुस्तक पेढीतील उद्देश:
समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत व दुर्बल असणाऱ्या लोकांसाठी पुस्तके पुरवणे ही योजना आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही अशी योजना आहे.
*या योजनेचा प्रसार
1) या योजनेचा फायदा जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना होतो कारण ही योजना फक्त गावापुरती, जिल्हा पुरती ,मर्यादित नाही तर ती राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होतो आहे.अनुदानित शाळेमध्ये 1 ली ते 7 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सन 2004-2005 मध्ये मोफत पुस्तके दिली गेली आहेत.या योजनेचा प्रसार राज्यभर झाला आहे.
योजनेचे नाव:
१०३ विकास गटांत सदर योजना सन १९९६-९७ पासून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समित्यांनी उपलब्ध करून दिलेल्या नियतव्ययाच्या आधारे शासनाकडून उपलब्ध होणा-या तरतुदींमधून जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील इयता १ ली ते ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकांचा लाभ देण्यात येतो.
अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
1 ली ते 4 थीच्या राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या 120 विकास गटातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा देण्यात येणार आहे.
हे ही वाचा
गणेश उत्सव 2023 नाशिक महानगरपालिका : गणेशभक्तांना आवाहन
इयत्ता 1ली ते 4थी सर्वच मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो. फक्त इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी सोडून. राष्ट्रीय स्त्री साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा राज्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यातील तालुके यामध्ये सदर योजनेची अंमलबजावणी केली जाते .राज्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण राष्ट्रीय स्त्री साक्षरतेच्या सरासरीपेक्षा कमी असलेल्या राज्यातील 103 विकास गटात सदर योजना सन 1996 ते 1997 पासून राबविण्यात येते.
योजना दोन चे उद्दिष्ट व्याप्ती पार्श्वभूमी:
या योजनेची सुरुवात 19 जून 1979 पासून सुरू झाली. अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती ,भटक्या जमाती, विमुक्त जमातीच्या मुलींची पटसंख्या खूप कमी असते कारण या जाती जमाती मधील लोक सहज शिक्षणासाठी बाहेर पाठवत नाहीत. समाजातील लोकांचे मत असते.मुलींसाठी त्यांच्या खूप अटी असतात, तिने शिक्षणासाठी बाहेर जाऊ नये यासारख्या. .
चुल आणि मूल यांच्या पलीकडे तिचं काही आयुष्य नसावं याकडे या समाजातील माणसांचा कलअसतो .त्यामुळे प्राथमिक शाळेत मुलींची पटसंख्या असमाधानकारक असते .जर या समाजातील मुला मुलींची पटसंख्या वाढवायचे असेल तर काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राथमिक शाळेतील 1 ली ते चौथी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीमधील किंवा जमाती मधील मुलांना लेखन साहित्य किंवा गणवेशाचे संच पुरवण्यात येतात. 80% रकमेचा गणवेश आणि 20% रकमेचे लेखन साहित्य अशी त्याची विभागणी करण्यात आली आहे राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या व विमुक्त जाती मधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
योजनेमध्ये शासनाने 2004 या सालापासून काही बदल केला असून एका विद्यार्थ्याला एक गणवेश 20% रकमेचे लेखक साहित्य देण्यात येते 1 ली ते 4 थी मधील विद्यार्थ्यांची गळती रोखून उपस्थिती वाढवण्यासाठी शासनाने 1996 ते 1997 पासून ही योजना सुरू केली आहे. 103 विकास गटातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
लाभार्थी निवडण्याची पद्धती:
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मुख्याध्यापकामार्फत संच वितरित केले जातात.पुस्तकाचे संच हे पाठ्यपुस्तक मंडळाकडून संचालयाने दिलेल्या वेळापत्रकानुसार प्राप्त करून विद्यार्थ्यांना वितरित करतात.
निकष: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू नाही तसेच 1 ली ते 4 थी मुला /मुलींचे आधार कार्ड असावे ,प्रथम मुले मुली 1 ली ते 4 थी मध्ये शिक्षण घेत असणारे असावेत.
योजना दोन चे कार्यपद्धती ,कार्यान्वित यंत्रणा, लाभार्थी निवडण्याची पद्धती:
संबंधित मुख्याध्यापकामार्फत इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रस्ताव 3 प्रतीत मुला/मुलींकरिता अनुक्रमे शिक्षणाधिकारी प्राथमिक योजना जिल्हा परिषदेकडे सादर करावे.
Pooja Patil,Writer,Activenama,Sangli