शुद्ध खाद्यतेल काढणारी मशीन : घरीच शुद्ध तेल काढा संपुर्ण माहिती.

शुद्ध खाद्यतेल काढणारी मशीन : घरीच शुद्ध खाद्यतेल काढणारी मशीन कशी आहे,किमंत किती,कुठे मिळते संपुर्ण माहिती.

आज कालच्या युगात पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. ज्याच्या सेवनाने आरोग्याला हानी पोहचू शकते.तशातच महागाईचे प्रमाण खूप वाढले आहे .रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात आहेत त्यामुळे वाढती महागाई मनुष्याला परवडत नसल्यामुळे तो भरकटला जाऊ लागला आहे.परिणामी काळाबाजार वाढला आहे. Pure Edible Oil Extraction Machine : Extract Pure Edible Oil at Home Complete Information

भेसळचे प्रमाण वाढल्यामुळे शुद्ध माल मिळणे खूप अवघड होऊन बसले आहे.शेतकरी सोडला तर बाकीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना या गोष्टींना सामोरे जावेच लागते. शेतकरी शेतात कष्ट करून तो शुद्ध माल पिकवतो आणि तो बाजारात विकतो.त्यानंतर त्या पदार्थावर प्रक्रिया करताना भेसळ केली जाते किंवा रसायने वापरली जातात.

हे ही वाचा : ChatGPT 4 च्या सहाय्याने संपुर्ण फोटो Analyse करता येणार. चांगले कि वाईट ?

शेंगदाण्याचे शुद्ध तेल आरोग्यासाठी चांगले ठरते. कमी श्रमात नैसर्गिक तेल मिळणे आता घरबसल्या अगदी सोपे झाले आहे.

ही भेसळ कुठेतरी थांबून शुद्ध तेल मिळून आरोग्य सुधारावे हा या यंत्राचा उद्देश आहे. हे यंत्र जवळपास सर्व प्रकारचे तेल काढण्यास योग्य ठरू शकते.या यंत्रामध्ये जवस, करडई ,मोहरी ,नारळ, बदाम,अक्रोड,सूर्यफूल या तेलबियांपासून तेल काढले जाते. यामध्ये नैसर्गिक तेल काढता येते. शाबू शेंगदाणा,साखर या पदार्थांमध्ये जास्त भेसळ आढळून येत असते.यावर उपाय आपण आपल्या पसंतीने तेल निघणा-या बिया निवडू शकतो आणि घरबसल्या तेल काढू शकतो .

80% डिस्काउंट मिळवा ! अमेझॉन वर !!
आपल्या घरात दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंवर 80% डिस्काउंट ! आजच या लिंक वर क्लिक करा आणि मिळावा.
लिंक :
https://amzn.to/3rwMc7b

या यंत्राची वैशिष्ट्ये

यामध्ये नैसर्गिक तेल काढता येणे शक्य होते. हे मशीन २४००० ते २८५०० हजारापर्यंत मिळते. प्रत्येकाला परवडणारी ही मशीन आहे . सोबत त्या मशीनला एक वर्षाची हमी देखील मिळते. जवस करडई, मोहरी ,शेंगदाणे यासारख्या तेलबियांचे शुद्ध तेल मिळते.माफक विजेवर चालते .

याच्या मदतीने काढलेल्या तेलात पोषक तत्व कायम असतात.तेलामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन असू शकत नाही.त्या मशीनला सलग पाच तास सुरू ठेवू शकतो. वेळ पडल्यास दिवसभरही चालू ठेवू शकतो.या मशीनची निर्मिती स्टेनलेस स्टीलचे साहित्य वापरून केली आहे.

हे ही वाचा : पदोन्नती नंतर एक वेतनश्रेणी : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांतील पदवीधर शिक्षकांना,मुख्याध्यापकांना,केंद्रप्रमुखांना !

त्यामुळे या यंत्राची गुणवत्ता चांगली आहे. एक किलो शेंगदाण्यामागे ४०० किंवा ४५० मिली इतके तेल मिळते. हे तेल पदार्थ मध्ये मिक्स केल्यानंतर पदार्थांची चव ही चांगली लागते. हे तेल स्वयंपाकात वापरण्यास अतिशय योग्य आहे .हे तेल आरोग्यासाठी चांगले व आरोग्यदायी ठरते. शरीरातील पोषक तत्वे ही अबाधित राहतात. ही मशीन वापरायला देखील अतिशय सोपी आहे.

बाहेरच्या तेलामध्ये हेनेक्स नावाचा पेट्रोलियम पदार्थ टाकला जातो .त्यामुळे खूप आजार वाढतात. हृदय विकाराचा झटका या आजारांना सामोरे जावे लागते . या मध्ये तयार केलेल्या बदामच्या तेलाचाही केसासाठी खूप चांगला वापर होऊ शकतो .

केस गळती ,केस पांढरे होणे यावर नैसर्गिक उपाय म्हणून हे तेल वापरले जाऊ शकते. बाजारातील बदामाच्या तेलामध्ये रसायन असते.नुकसानकारक तेलाचा वापर टाळा आणि हृदय विकाराचा झटका या अशा मोठ्या आजारांपासून लांब राहा .या मशीन मधून मिळणारे शुद्ध तेल वापरावे. आपले आरोग्य सुखदायी ठेवावे. ऑइल मेकर मशीन,रियल ग्रुप कंपनी ची असून नारायण पेठ,पुणे येथे कार्यालय आहे.

Leave a Comment