क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३ आवेदने ऑनलाईन मागविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचे परिपत्रक ही आले झाले आहे.परिपत्रक खाली देण्यात आले आहे.आवेदन कसे करायचे आहे,याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
याविषयी परिपत्रक पहा आणि डाऊलोड करा
शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे,त्यामुळे शिक्षकाच्या सेवाभावी,समर्पित वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे आयोजन असते.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.
लिंकवर आपली आवेदने दिनांक २५ मे २०२३ रोजी पासून दिनांक १५ जून २०२३ रोजी पर्यंत सादर करावीत. सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना / लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे. असे संचालनालयाच्या संदर्भ क्र. २ अन्वये कळविण्यात आले होते परंतु…
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर
https://forms.gle/z5mw9A2dTu6J3zyNA ही लिंक chrome browser वर नवीन tab वर ओपन करावी आणि माहिती भरावी.
पुरस्कारासाठी आवेदने सादर करणाऱ्या शिक्षकांचा काही जिल्हे तसेच काही प्रवर्ग याबाबत अल्प प्रतिसाद पाहता दिनांक २० जून,२०२३ रोजी पर्यंत आवेदने सादर करण्यासाठी या पत्रान्वये मुदतवाढ देण्यात येत आहे.
आपल्या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांनी जास्तीत जास्त आवेदने सादर करण्यासाठी प्रोत्साहित करावे. पुरस्कारासाठी आवेदने सादर करण्यासाठी सर्व शिक्षकांपर्यंत पुनश्चः स्वतंत्रपणे सूचना / लेखी आदेश निर्गमित करावेत तसेच वर्तमानपत्रात जाहीर करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास पाठवावा असे वरील पातळीवरून आदेश देण्यात आले आहेत.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680