महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागांतर्गत 4644 तलाठी पदांच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेला ला सुरुवात : जाहिरात पाहिली नसेल तर जाहिरात पहा.

 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण 4644 पदांच्या सरळ सेवा भरती करिता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) , पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हानिहाय किती जागा आहेत याची माहिती मिळणार आहे.

या भरती पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे याबाबत आपण पाहणार आहोत.Direct Service Recruitment Process for 4644 Talathi Posts under Government of Maharashtra Revenue Department : If you have not seen the advertisement then check the advertisement.

शैक्षणिक अर्हता –

. जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

  •  महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र. मातंस-२०१२/प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त कर आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

७.२ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-

  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस.एस.सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

८. पात्रता :-

  •  भारतीय नागरिकत्व

८.२ वयोमर्यादा :-

  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक :- दि. १७/७/२०२३
  • परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना : 

पदाचे नाव : तलाठी

मराठी :.                          25 प्रश्न : 50 गुण

इंग्रजी:                            25 प्रश्न. : 50 गुण

सामान्य ज्ञान :                   25 प्रश्न : 50 गुण

बौद्धिक चाचणी / अंकगणित : 25 प्रश्न : 50 गुण 

एकूण प्रश्न : 100 

एकूण गुण :  200

परीक्षा कालावधी : 2 तास (120 मिनिटे) 

* परीक्षेचे स्वरुप :-

१) परिक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.

२) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी ) च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावर प्रश्नाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

३) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. प्रनिमं- २००९/प्र.क्र.३५६/ई-१०, दि.०१/०१/२०१० मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय, सामान्य प्रशासन शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार या पदांकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत.

४) उमेदवारांची निवडसूची तयार करणेसाठी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र.एसआरव्ही-१०९७/प्र.क्र.३१/९८/१६अ, दि.१६/३/१९९९ आणि शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. संकीर्ण१११९/प्र.क्र३९/१६-अ, दि. दि. १९/१२/२०१८ तसेच शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.

५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

६) परीक्षेचा निकाल (निवडसुची) तयार करतांना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि.४ मे २०२२ मध्ये आधारे क्रमवार लावला जाईल. नमुद निकषांच्या

परिक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. (Normalization) बाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकार कराहील. याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे संलग्न (Upload) करणे:-

एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल फॉरमॅट मध्ये संलग्न (Upload) करावीत.

दोन) विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) संलग्न (Upload) करणे अनिवार्य आहे.

  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम
  • शैक्षणिक अर्हता)
  • वयाचा पुरावा
  • प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
  • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
  • अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • एस. एस. सी नावात बदल झाल्याचा पुरावा
  • अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • अनुभव प्रमाणपत्र

विविध अराजपत्रित प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा काय आहेत ते आपण या जाहिरातीमध्ये पाहूया. या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात आपण डाऊनलोड करून घ्यावी आणि पहावी.

संपूर्ण जाहिरातीची माहिती या संकेत स्थळावर उपलब्ध आहे https://mahabhumi.gov.in

Leave a Comment