विद्याप्रवेश कार्यक्रम (इयत्ता पहिली) सन 2023-24 काय आहे याची संपुर्ण माहिती.

 आपणास सर्वांना माहित आहे की संपूर्ण देशभर निपुण भारत या योजनेची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. इयत्ता पहिली ते तिसरी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित होण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून हा एक नवीन कार्यक्रम मागील वर्षापासून सुरू केलेला आहे. त्याचे नाव आहे विद्याप्रवेश शाळा पूर्व तयारी कार्यक्रम.

 इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या बालकांना शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेणे सहज सोपे व्हावे, त्यांच्या वयानुसार योग्य असे अध्ययन अनुभव देण्यासाठी शाळेत कृती,उपक्रम,खेळ यांचे आयोजन केले जाणार आहे, या हेतूने विद्याप्रवेश कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. Complete information about Vidya Pravesh Program (Class I) Year 2023-24

 विद्या प्रवेश कार्यक्रमाचे स्वरूप

             राज्यातील सर्व शाळांवर हा कार्यक्रम राबविण्याचे बंधन असणार आहे. हा कार्यक्रम 3 महिने राबवला जाणार आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणी हा कार्यक्रम 19 जून 2023 ते 9 सप्टेंबर 2023 या कालावधीत राबवला जाणार आहे. विदर्भामध्ये दिनांक 3 जुलै 2023 ते 23सप्टेंबर 2023 या कालावधीत राबवला जाणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थी कृतिपुस्तिका वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षक मार्गदर्शिका सुद्धा शिक्षकांना मार्गदर्शनासाठी वितरित करण्यात येणार आहे.

विद्याप्रवेश कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या प्रत्येक शाळेत एक ‘ शिक्षक मार्गदर्शिका ‘ व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक या प्रमाणात ‘ विद्यार्थी कृतिपुस्तिका ‘ हे साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र ,पुणे यांचे मार्फत विकसित करून वितरित झालेले आहे. तसेच सदर साहित्य परिषदेच्या www.maa.ac.in यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर साहित्य डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर जावे 👇
▪️ विद्याप्रवेश :शिक्षक मार्गदर्शिका- https://rb.gy/obmvj
▪️ विद्या प्रवेश:विद्यार्थी कृतिपुस्तिका-👇
https://rb.gy/hdt3v

▪️विद्याप्रवेश कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात अधिक माहितीसाठी गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या ऑनलाइन शिक्षक उद्बोधन सत्राची लिंक👇
https://www.youtube.com/watch?v=VA9irGeUTmo

▪️ कार्यक्रमासंदर्भात सविस्तर सूचनांचे पत्र लिंक 👇
https://rb.gy/qz4mr

उपरोक्त प्रमाणे सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये विद्या प्रवेश कार्यक्रमाची अंमलबजावणी
करण्यात यावी.

उद्दिष्टे

  1. भिन्न सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र सर्व मुलांना शाळा प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे.
  1. मुलांना इयत्ता पहिली मधील प्रवेश सहज व आनंददायी करणे.
  1. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी आनंददायी आणि उत्साही वातावरणात वयानुरूप व खेळ आधारित शैक्षणिक अनुभव देणे.
  1. भिन्न सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या सर्व मुलांना त्यांच्या वयानुरूप आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक प्रारंभिक शिक्षण अनुभव प्रदान करणे.
  1. मुलांच्या सर्वांगिनी विकासासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर लक्ष केंद्रित करणे याकरिता शिक्षकांचे अध्यापन,शास्त्रीय पायाभरणी मजबूत करणे.
  1. खेळ आधारित अध्यापन शास्त्रीय दृष्टिकोनातून मुलांचे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यात अभिप्रेत असलेल्या क्षमता विकसित करणे.

कार्यक्रमाचे नियोजन कारवाही

    शिक्षकांची भुमिका

हा कार्यक्रम राबविण्याचे संपूर्ण राज्यातील शाळांवर बंधनकारक आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. इयत्ता पहिलीच्या शिक्षकांना मुलांकडून कृती करून घ्यायच्या आहेत. त्याना कृती, उपक्रम, खेळ, यांचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. उदा.., सोमवारी कोणत्या कृती,उपक्रम,खेळ घ्यायचे? मंगळवारी कोणते घ्यायचे याचे संपूर्ण नियोजन पहिलीच्या वर्ग शिक्षकांना करावे लागणार आहे. यासाठी लागणारे साहित्य शिक्षकाला अगोदरच्या दिवशी उपलब्ध करून ठेवावे लागणार आहे. या कृती, खेळ उपक्रमाच्या समांतर सुद्धा खेळ,उपक्रम,कृती शिक्षकांना घेण्यास वाव आहे. वर्ग शिक्षकांनी मुलांकडून कृती, उपक्रम,खेळ, नियमित घेणार असल्याने त्यांची बसण्याची योग्य व्यवस्था करावी लागणार आहे. वर्गात मुलांना प्रसन्न वाटण्यासाठी वर्ग सजावट ही करावी लागणार आहे. प्रत्येक शाळेत भाषापेटी,गणितपेटी, इंग्रजी पेटी उपलब्ध आहेत त्याचाही वापर करणे अपेक्षित आहे. विद्याप्रवेश उपक्रमात पालकांचाही वाटा खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी शिक्षकांनी दर शनिवारी पालक सभा घेणे आवश्यक आहे.त्या सभेचे इतिवृत्त ही ठेवणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांसाठी दररोज उपक्रम

  1.  स्वागत भेट
  2. आमची दैनंदिनी
  3. मुक्त खेळ
  4. पायाभूत साक्षरता
  5. पायाभूत संख्याज्ञान/परिसर अभ्यास
  6. भोजन
  7. सर्जनशीलतेचा विकास
  8. मैदानावरील खेळ
  9. निरोप

     विद्या प्रवेश उपक्रमासाठी लागणारे कृतिपुस्तिका,शिक्षक मार्गदर्शिका इतर वर्गाचे प्रश्नसंच संपूर्ण माहिती पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

www.maa.ac.in

विद्या प्रवेश:विद्यार्थी कृतिपुस्तिका-👇
https://rb.gy/hdt3v

विद्या प्रवेश:विद्यार्थी कृतिपुस्तिका-👇
https://rb.gy/hdt3v

Leave a Comment