स्वतःचा लघुउद्योग उभा करायचा आहे का ? या ठिकाणी प्रवेश घेऊन स्वतःचा उद्योग करा,त्याआधी जाहिरात पहा.

Do you want to set up your own small business? Enter this place and start your own business.Watch advertisement.

आपल्या सर्वांना माहीत आहे की,सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामागे अनेक कारणे आहेत त्यापैकी एक कारण म्हणजे महाराष्ट्रीयन तरुण उद्योगास महत्त्व न देता सरकारी नोकरीच्या मागे धावत असतो. दोष त्याचाही नाही त्याच्या परिवारातील लोक सुद्धा उद्योग धंद्याला पाठिंबा न देता नोकरीसाठी मानसिक आधार देत असतात. त्यामुळे तरुण वर्ग सरकारी नोकरी न मिळाल्यामुळे हताश होतो.

इतर राज्यातील तरुणांची,लोकांची मानसिकता महाराष्ट्रीयन तरुणा पेक्षा फार वेगळी आहे. ते उद्योग धंद्यांना जास्तीत जास्त महत्त्व देतात. स्वतः उद्योग करता करता एक दिवस त्या उद्योगाचा मालक बनतात आणि इतरांना नोकरीवर ठेवतात. हीच मानसिकता महाराष्ट्रीयन तरुणांनी सुद्धा अंगीकारली पाहिजे. महाराष्ट्रातील तरुणांनी स्वतः उद्योग केला पाहिजे त्यासाठी विविध संस्था विविध प्रशिक्षण देत असतात त्यांची फार काही फी नसते. Do you want to set up your own small business? Enter this place and start your own business.Watch advertisement.

अशीच एक नाशिक मधील केंद्र सरकारची संस्था आहे डॉ. श्री बी. आर. आंबेडकर ग्रामीण प्राद्योगिकी व प्रबंध संस्थान, खादी और ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म लघु और उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत होतकरू युवक युवतींसाठी स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी देण्यात येत आहे. ही प्रशिक्षण संस्था नाशिक-त्र्यंबक रोड, त्र्यंबक विद्या मंदिर जवळ आहे. त्याचबरोबर 265 एकर निसर्गरम्य परिसरात पसरलेल्या या संस्थेत अद्यावत क्लासरूमस आहेत.

उच्च दर्जाच्या तांत्रिक प्रयोगशाळा आहेत. त्याचबरोबर प्रात्यक्षिक शेड, आधुनिक मशनरी, आणि तज्ञांचे उत्कृष्ट मार्गदर्शन उपलब्ध आहे. या ठिकाणी विविध अभ्यासक्रम शिकवण्यात येत असतात. त्यामध्ये बेकरी, फळे व भाजीपाला प्रक्रिया, ग्रामीण तेल प्रक्रिया, मसाला उद्योग, पेपर कन्वर्जन (पेपर डिश पाकीटे) शिलाई प्रशिक्षण, अंघोळीचा व कपडे धुण्याच्या साबण, फिनाईल व डिटर्जंट पावडर, अगरबत्ती बनवणे, बेसिक संगणक कोर्स, प्राकृतिक पेंट बनवणे, खाली कताई आणि ग्रामीण तेल उद्योग इत्यादींचा समावेश होतो.Do you want to set up your own small business? Enter this place and start your own business.Watch advertisement.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

  • फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • मार्कशीट
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला (एससी /एसटी/ ओबीसी) साठी

वयोमर्यादा

  1. कमीत कमी सोळा वर्षे वय आवश्यक
  2. शैक्षणिक पात्रता कमीत कमी आठवी पास
  3. ज्या प्रशिक्षणार्थींना वस्तीगृहात प्रवेश पाहिजे असेल त्यांना मात्र रुपये पाचशे प्रतिमाह शुल्क आकारण्यात येईल.
  4. वस्तीगृहातील भोजनाची व्यवस्था अंदाजे रुपये 3000-3500 (30 दिवस) पर्यंत राहील
  5. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेबद्दल सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात येईल.

इनक्युबेशन सेंटर-प्रशिक्षण केंद्रामध्ये खाद्य प्रशोधन उद्योगासाठी (कोर्स १,२,३,४ साठी) इच्छुक प्रशिक्षणार्थींना त्यांचे स्वतःची युनिट सुरू होईपर्यंत त्यांच्या मालावर येतील संयमाद्वारे विशिष्ट कालावधीपर्यंत प्रक्रिया शुल्क घेऊन उत्पादन करण्यास मदत केली जाईल.

प्रत्येक रविवारी तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवारी प्रशिक्षण केंद्रात सुट्टी राहील.

दूरध्वनी- 0253-2970071, सकाळी 10 ते 1,

ज्यांना लघुउद्योग उभारायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. माफक फी आणि कमी कालावधीमध्ये हे प्रशिक्षण वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे खूप मोठी संधी आहे असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रातील इच्छुक तरुणांनी या ठिकाणी संपर्क साधून आपले प्रवेश निश्चित करावेत.

अनअभ्यासक्रमाचे नावकालावधीपरीक्षा शुल्क जी एस टी सहितसंपर्कासाठी फोन नंबर
बेकरी१ महिनारु.२३६०.००
फळे व भाजीपाला प्रक्रिया१५ दिवसरु.१७७०
ग्रामीण तेल प्रक्रिया (लाकडी घाणी )१५ दिवसरु.१७७०
मसाला उद्योग१५ दिवसरु.१७७०
पेपर कन्व्हर्जन (पेपर डिश/पाकिटे )१५ दिवसरु.१७७०
शिलाई प्रशिक्षण२ महिनेरु.४७२००२५३ -२९७००७१
आंघोळीचा व कपडे धुण्याचा साबण,
फिनाईल व डिटरजंट पावडर,अगरबत्ती बनवणे
१५ दिवसरु.१७७०स.१० ते सायं.५ पर्यंत
बेसिक संगणक कोर्स१ महिनारु.२३६०.००
प्राकृतिक पेंट बनवणे५ दिवसरु.५०००.००
१०खादी कताई१ महिनाविद्यावेतन सहित
११ग्रामीण तेल उद्योग२ महिनेविद्यावेतन सहित
प्रत्येक रविवारी तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवारी प्रशिक्षण केंद्रास सुट्टी राहील.

Leave a Comment