माझी कन्या भाग्यश्री योजने बद्दल संपुर्ण माहिती जाणून घ्या…| Majhi Kanya Bhagyashri Yojana

माझी कन्या भाग्यश्री योजने बद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.महाराष्ट्र राज्यात दिनांक 1 ऑगस्ट 2017 च्या निर्णयान्वये सुधारित माझी कन्या भाग्यश्री ही योजना लागू करण्यात आली होती.

 काय आहे भाग्यश्री योजना ?

हे ही वाचा

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित  समूहगीत स्पर्धा   २०२३-२४  (वर्ष २ रे) : इच्छुक शाळांनी आत्ताच गुगल फॉर्म भरा लिंक दिली आहे.

माझी कन्या भाग्यश्री ही योजना मुलींशी संबंधित असल्याचे वरील शीर्षकावरून आपल्याला कळले असेल . देशात आजही अशी परिस्थिती आहे की, मुलीं मुले असा भेदभाव तर केला जात असतोच.कधी कधी मुलींचे लवकरात लवकर लग्न लावून दिले जाते. समाजाचा हा दृष्टिकोन बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्या ज्या कुटुंबांमध्ये एक किंवा दोन मुली झाल्यानंतर नसबंदी केली जाते. त्या सर्वांना माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत शासनाकडून 50,000 रुपये वितरित करण्यात येत असतात.समाजामध्ये मुलींबाबत आजही भेदभाव होत असतात म्हणून समाजामध्ये प्रबोधन करण्याचे काम ही सरकार करत असते. सरकार मुलींसाठी अनेक प्रोत्साहानपर योजना काढत असते .सरकारने यासाठी काही विशिष्ठ नियमावली लावली आहे.यासाठी काही पात्र कुटुंबाना च ही माझी कन्या भाग्यश्री योजना लागू होते .एखाद्या कुटुंबात जर मुलगी जन्माला आली तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्या मुलीला योजनेअंतर्गत 50,000 रुपये एवढी रक्कम मिळेल.त्याच कुटुंबामध्ये जर दुसरी मुलगी जन्माला आली व तिचे पालक जर नसबंदी करून घेत असतील . तर दोन्ही मुलींना या योजनेअंतर्गत 25-25 हजारांची रक्कम दिली जाईल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्टे:-

हे ही वाचा

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS EXAM) : संपुर्ण माहिती आणि मार्गदर्शन.

        माझी कन्या भाग्यश्री योजनेचा हा उद्देश आहे की मुलींच्या शिक्षणाविषयी समाजाला प्रोत्साहन देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजात अजूनही कित्येक लोक मुलांचा जन्म झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करत असतात. मुलीचा जन्म झाल्यानंतर आनंद साजरा केला जात नाही. जन्माला आलेल्या मुली बद्दलची मानसिकता बदलणे व त्या मुलीचे योग्यरित्या पालन पोषण करणे व तिच्या संपूर्ण गरजा पूर्ण करणे यासाठी प्रोत्साहन देणे हा शासनाचा उद्देश आहे. म्हणून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीने आपल्या मुलीचे संपूर्ण शिक्षण पूर्ण करणे, ज्यामुळे भविष्यात निर्माण होणारी मातांची पिढी शिक्षित राहतील. त्यांना होणारा मुलगा किंवा मुलगी आरोग्य संपन्न व शिक्षित होईल .सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजनेचा महत्त्वाचा उद्देश पूर्ण होईल तो म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये कोणताही भेदभाव राहणार नाही. या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करून मुलींना शिक्षित व स्वयंपूर्ण (स्वतःच्या पायावर उभे राहणे) हा उद्देश महाराष्ट्र शासनाचा आहे.

हे ही वाचा

आपल्या मुलाचा किंवा मुलीचा जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे का ? मुदतीच्या आतच हे करा.मुदत किती

उद्दिष्टे:-

  • लिंग निवडीस प्रतिबंध करणे/ मुलगा मुलगी निवडीस प्रतिबंध करणे..
  • मुलींचा जन्मदर वाढवणे.
  • मुलींच्या जीवनमानाबद्दल खात्री देणे.
  • मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे.
  • मुलींना समान दर्जा आणि शैक्षणिक प्रोत्साहना करिता समाजात कायमस्वरूपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे.
  • मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे व खात्री देणे.
  • महिला बचत गट व युवक मंडळ यांचा सहभाग वाढविणे.

        या योजनेच्या अंतर्गत शासनाच्या नियमानुसार  दारिद्र्य रेषेवरील (APL) पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुलीला ही योजनेचा लाभ मिळणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या,”पृथ्वीरत्न” पुरस्काराने सन्मानित आकाश पोपळघट ची प्रेरणादायी कहाणी

माझी कन्या भाग्यश्री योजना लागणारे आवश्यक कागदपत्रे :-

  • लाभ मिळालेल्या मुलीचे पालक हे कायमचे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे, म्हणून पालकाचे नियमाप्रमाणे रहिवासी प्रमाणपत्र.
  • मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र.
  • लाभार्थी कुटुंबांची योजनेसाठी अर्ज करत असताना एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र.
  • दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र.
  • अर्जदाराचे आधार कार्ड.
  • BPL श्रेणी रेशनकार्ड.
  • मिळकत प्रमाणपत्र.
  • अर्जदाराची मोबाईल नंबर.
  • मुलीचे व आईचे बँक पासबुक.
  • पासपोर्ट साईज फोटो.

         माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये मिळणारी धनराशी योजनेअंतर्गत ठराविक रक्कम मुलीच्या नावे बँकेमध्ये मुदती वरती गुंतवली जाते आणि सुरुवातीला मुलीच्या वयाच्या सहाव्या वर्षी, त्यानंतर बाराव्या वर्षी गुंतवल्या जाणाऱ्या रकमेवरचे फक्त व्याज आणि नंतर मुलीचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मुदत ठेवीची संपूर्ण रक्कम व्याजासह मुलीला देण्यात येते.

हे ही वाचा

घरबसल्या मिळवा आरटीओ च्या सेवा.. कार्यालयात जाण्याची गरज नाही

         माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 योजनेसाठी अर्ज या पद्धतीने भरावा या योजनेचे लाभ मिळण्यासाठी पात्र पालकांनी ऑनलाइन फॉर्म पीडीएफ डाउनलोड करून किंवा योजनेच्या संबंधित कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज घेऊन आपल्या विभागातील अंगणवाडी सेविकेच्या मदतीने संपूर्ण अर्ज तपशीलवार भरून अर्जाला आवश्यक कागदपत्रे जोडून योजनेच्या संबंधित महिला व बालक विकास कार्यालयात जमा करावा.

Leave a Comment