आपणास माहित असेल किंवा नसेल नाशिक महानगरापालिका नाशिक मार्फत अनेक कल्याणकारी योजना दिव्यांगासाठी राबविण्यात येत आहेत.सर्वांना माहित व्हाव्यात यासाठी संपुर्ण योजनांची माहिती याठिकाणी आम्ही देत आहोत.Brief information about disabled welfare schemes implemented through Nashik Municipal Corporation.
हे ही वाचा
नाशिक महानगरपालिके मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची थोडक्यात माहिती.
नाशिक महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी माननीय महासभेच्या मान्यतेने पाच टक्के राखीव निधीतून खालील प्रमाणे 1 ते 11 कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.
1. कर्णबधिर दिव्यांगांना Cochlear Implant सर्जरी करिता अर्थसाह्य योजना
- Cochlear Implant सर्जरी करिता रक्कम रुपये पाच लाखापर्यंत अर्थसाहाय्य देण्याचे प्रावधान आहे.
- वयोमर्यादा कमाल दहा वर्षे राहील
हे ही वाचा
इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज या तारखेपासून सुरु
2. दिव्यांगाना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य योजना.
- दिव्यांगाना स्वयंरोजगारासाठी रक्कम रुपये एक लाखापर्यंत अर्थसाह्य देण्याचे प्रावधान आहे.
3. दिव्यांग बेरोजगार अर्थसाह्य योजना :
- यामध्ये वय वर्ष अठरा वर्षे चे पुढील बेरोजगार दिव्यांगांना दरमहा रक्कम रुपये 3000 अर्थसाह्य देण्याचे प्रावधान आहे.
- अर्जदार नोकरी अथवा उद्योग करत नसल्याचे स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे.
हे ही वाचा
आता या कर्मचाऱ्यांना मिळणार CMP प्रणाली द्वारे वेतन | परिपत्रक निर्गमित
4. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांकरिता शिक्षण/ प्रशिक्षणाकरिता अर्थसहाय्य योजना :
- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षण व प्रशिक्षणाकरिता रक्कम रुपये 5 ते 50 हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्याचे प्रावधान आहे.
5. दिव्यांगासाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणाकरिता अर्थसहाय्य योजना :
- दिव्यांग विद्यार्थ्यांना रक्कम रुपये 20 ते 40 हजारापर्यंत अर्थसहाय्य/ शिष्यवृत्ती देण्याचे प्रावधान आहे.
- नाशिक महानगरपालिकेच्या व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू राहील. मात्र शिक्षण संस्था / शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र बंधनकारक राहील.
- त्या त्या आर्थिक वर्षाचे शिष्यवृत्ती मिळणे करिता त्या त्या वर्षाचे आर्थिक / शैक्षणिक वर्षात माहे 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. Brief information about disabled welfare schemes implemented through Nashik Municipal Corporation.
हे ही वाचा
6. दिव्यांगाना सहाय्याभूत साधने व तंत्रज्ञाना करिता अर्थसहाय्य योजना :
- दिव्यांगांना साह्या भूत साधने व तंत्रज्ञान साहित्य घेण्याकरिता रक्कम रुपये एक लाखापर्यंत अर्थसाह्य देण्याचे प्रावधान आहे.
- अर्जदार / दिव्यांगांचे पालकांनी चलन वलन साहित्याच्या आवश्यकतेबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
7. विशिष्ट गरज असणाऱ्या दिव्यांग व्यक्ती करिता अर्थसहाय्य योजना:
- दिव्यांग व्यक्तींना दुर्धर आजारासाठी व्यंग सुधार शस्त्रक्रियेकरिता विवाह घर व परिसरामध्ये वातावरण अडथळा मुक्त करण्याकरिता व इतर कारणाकरिता रक्कम रुपये एक लाखापर्यंत अर्थसाह्य देण्याचे प्रावधान आहे.
8. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था / संघटनांचे सक्षमीकरण करणे.
- यामध्ये दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना रक्कम रुपये पाच लाख व संघटनांचे सक्षमीकरण करण्यासाठी रक्कम रुपये एक लाख पर्यंत अर्थसहाय्य देण्याचे प्रावधान आहे.
हे ही वाचा
मोकळ्या जागेपासून पैसे कसे मिळवू शकाल |यातील एक तरी पर्याय लागू पडेल
9. मतिमंद / मेंदूपिढीत तसेच बहुविकलांग दिव्यांग व्यक्तींना अर्थसाह्य योजना
- यामध्ये वय वर्ष दहा वर्षाच्या पुढील मतिमंद/ मेंदूपिढीत/बहुविकलांग दिव्यांगांना दरमहा रक्कम रुपये 3000 अर्थसाह्य देण्याचे प्रावधान आहे.
- अर्जदार नोकरी किंवा उद्योग करीत नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
10. दिव्यांग खेळाडू ज्यांनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे किंवा जे खेळाडू विविध क्रीडा स्पर्धेकरिता परदेशात होणाऱ्या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवू इच्छितात अशा दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य योजना :
- यामध्ये दिव्यांग खेळाडू ज्यांनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे किंवा जे खेळाडू विविध क्रीडा स्पर्धेकरिता परदेशात होणाऱ्या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवतात अशा दिव्यांग खेळाडूंसाठी रक्कम रुपये पाच हजार ते एक लक्ष पर्यत अर्थसहाय्य देण्याचे प्रावधान आहे.
हे ही वाचा
एकदा चार्ज केल्यावर चालते 70 किलोमीटर ही इलेक्ट्रिक सायकल|बाजारात नवीन येणार येत्या दिवाळी नंतर .
11. दिव्यांग विवाह अर्थसाह्य योजना :
- दिव्यांग व अदिव्यांग विवाहितांना प्रोत्साहन देण्याची योजना किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींशी दिव्यांगत्व नसलेल्या सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या दांपत्यास सदरची योजना लागू राहील. यामध्ये रक्कम रुपये एक लाख अर्थसहाय्य देण्याचे प्रावधान आहे.

Writer,Activenama