WhatsApp वर अशी सेटिंग सुरू असेल तर फोन हॅक होऊ शकतो त्यासाठी आपल्या फोन चे संरक्षण कसे करावे या विषयी सविस्तर माहिती.
आजच्या काळात तंत्रज्ञान खूपच प्रगत झालेले आहे. त्यामुळे लोकांना याचा फायदा होतो परंतु तंत्रज्ञानामुळे तोटा देखील होऊ शकतो. लोकांना बळी बनवण्यासाठी हॅकर्स अनेक मार्ग काढत असतात. अशीच एक पद्धत हॅकर्स ने शोधून काढलेली आहे. ती पद्धत म्हणजे व्हाट्सअप च्या माध्यमातून लोकांना ते बळी बनवू शकतात. व्हाट्सअप वर असे अनेक सेटिंग असतात ज्या डिफॉल्ट म्हणून ऑन असतात. हे फीचर तुमचा डेटा अधिक वापरत तर असतातच परंतु तुमच्यासाठी ते अधिक धोकादायक ठरू शकते.
त्यातलेच एक फीचर म्हणजे व्हाट्सअप मीडिया ऑटोमॅटिक डाउनलोड होणे. हे आपल्या WhatsApp सेटिंग मध्ये ऑन असते. हे ऑन असल्यामुळे तुम्हाला यामध्ये फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, आणि डॉक्युमेंट्स download चा पर्याय मिळतात.
हे ही वाचा: शेत जमीन खरेदी करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी
या फीचरचा फायदा हॅकर्स कसा करू शकतो याविषयी सविस्तर माहिती समजून घ्या.
हॅकर्स अनेक पद्धतीने मालवेअर सारखे वायरस पाठवत असतात. त्यातलीच एक पद्धत म्हणजे हॅकर्स इमेज मध्ये लपवलेले मालवेअर पाठवतात. यामुळे मोबाईल हॅक होत असतो. मोबाईल मधले कोणतेही फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स डाउनलोड आपण नेहमी करतो. डिफॉल्ट सेटिंग मध्ये हा सर्व मीडिया ऑटो डाउनलोड वर असतो. अशावेळी हॅकर्स आपल्या फोनमध्ये मालवेअर च्या माध्यमातून शिरू शकतात .
असे होऊ नये म्हणून तुम्ही ऑटो डाउनलोड सेटिंग बंद करू शकता. यासाठी तुम्हाला व्हाट्सअप सेटिंग मध्ये जावे लागेल.
● मॅन्युअलवर तुम्ही सर्व सेटिंग्स सेट करू शकतात.
● तुम्हाला मीडिया डाऊनलोड लिस्ट मधील सर्व पर्याय अनचेक करावे लागतील.
● अनचेक केल्यानंतर, फक्त तुम्ही डाऊनलोड केलेला मीडिया डाउनलोड होईल.
● यामुळे कोणतीही मीडिया आपोआप डाउनलोड होणार नाही.
हे ही वाचा: मेडिक्लेमच्या या नियमात सरकार बदल करणार | ग्राहकांना दिलासा
या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्याने हॅकर्स ना लोकांना फसवण्याची संधी मिळणार नाही.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680