Table of Contents
शाहरुख खानच्या’ जवान ‘ची सात दिवसात किती कोटींची कमाई केली हे जाणून घेऊयात….
जवान मध्ये अनेक अप्रतिम कलाकारांची विविधता
जवान पहिल्या दिवशी मोडला’ पठाण’, ‘ गदर ‘चा विक्रम
‘जवान ‘अनेक टॉप चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार आहे असे वाटते
शाहरुख खानच्या करियर मधील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून “जवान ” या चित्रपटाकडे पाहिले जाते.या चित्रपटाने अनेक रेकोर्ड मोडले आहेत आणि मोडेल अशी परिस्थिती दिसत आहे. या चित्रपटाची निर्मिती RED CHILLIES ENTERTAINMENT कंपनीने केलेली आहे.
हे ही वाचा
निपाह व्हायरस ची दहशत : निपाह संपुर्ण माहिती.देशात अलर्ट
अभिनेता शाहरुख खानचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ॲक्शन थ्रिलर चित्रपटांना ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर मागे टाकून इतिहास रचला आहे. जवान हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ‘ जवान ‘ चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात जवळपास 75 कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरात 125 कोटी रुपयांची कमाई केली.
जवान चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये 75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.जवान चित्रपटाने हिंदीत 65 कोटींचे कलेक्शन केले आहे. जवान चित्रपटाने तमिळ भाषेत पहिल्या दिवसाची कमाई 5 कोटीची आहे. तेलगू भाषेत या चित्रपटानी पाच कोटी रुपयांची कमाई केली आहे.
रिपोर्टनुसार,जवान हा चित्रपट सर्वात जास्त ओपनिंग डे कलेक्शन करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.
जवान चित्रपटाचा कलेक्शन मध्ये घसरण झाली आहे. जवान चित्रपटाने रविवारी 80 कोटींचा गल्ला जमवून इतिहास रचला तर सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये घसरण झाली. सोमवारी या चित्रपटाने 32.92 कोटी रुपयांची कमाई केली होती. मंगळवारी 26 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटांना केली होती.
आता रिलीज च्या 7 व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चित्रपटाने 23 कोटींची कमाई केली आहे.
जवान चित्रपटाची सात दिवसांची एकूण कमाई आता 367.58 कोटीवर पोचली आहे.लवकरच हा चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असे म्हटले जात आहे.
हे ही वाचा
शाहरुख खानचा “जवान” चित्रपट दाखवतो आरसा आणि आसमान एकाच वेळी !
जवान मध्ये अनेक अप्रतिम कलाकारांची विविधता
विजय सेतु पतीने या चित्रपटात खलनायक कालीची भूमिका साकारली आहे तर नयनतारांने एक प्रामाणिक पोलीस कर्मचारी नर्मदा हीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात दीपिका पदुकोणचाही कॉमिओ आहे.
जवान चित्रपटात भ्रष्टाचार ,आत्महत्या, ढासळणारी आरोग्यवस्था या मुद्द्याबाबत या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.
जवान चित्रपटाची गौरी खान यांनी निर्मिती केली आहे , तर गौरव वर्मा यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.
एटलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे .नयनतारा ,विजय दत्ता, सान्या मल्होत्रा ,प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरजा ओक या कलाकारनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत .विशेष म्हणजे या चित्रपट हिंदी सोबतच तमिळ आणि तेलुगु भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.
हे ही वाचा
नाशिक गौरव 2023 : भव्य जिल्हास्तरीय नृत्य,समुहनृत्य व गायन स्पर्धा.
जवान पहिल्या दिवशी मोडला’ पठाण’, ‘ गदर ‘चा विक्रम
शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलीवूडचा किंग ठरला आहे .जेव्हा या चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून कमाईचे आकडे समोर आले आहेत . जवान च्या जबरदस्त कमाई द्वारे शाहरुख खान ने स्वतःचा’ पठाण’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.
सात दिवसांची कमाई
पहिल्या दिवशी 75 कोटी
दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी
तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी
चौथ्या दिवशी ८०.१० कोटी
पाचव्या दिवशी 32.92 कोटी
सहाव्या दिवशी 26 कोटी
सातव्या दिवशी 23.3 कोटी
हे ही वाचा
मोबाईल वर निर्बंध आता नाशिक मनपा शाळांमध्ये ! परिपत्रक जारी
‘जवान ‘अनेक टॉप चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार आहे असे वाटते
शाहरुख खानचा बहूप्रतीक्षित चित्रपट’ जवान ‘अखेर 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून साउथ चे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर आतापर्यंतच्या सर्व भारतीय चित्रपटांना मागे टाकण्यासाठी च तयार केला आहे असे वाटते.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680