शाहरुख खानचा “जवान” चित्रपट
शाहरुख खानचा “जवान” हा चित्रपट आज लोकांच्या हदयावर राज्य करत आहे.’शानदार, जबरदस्त जिंदाबाद!! ‘ हा’ मांझी ‘मधील डायलॉग या चित्रपटासाठी अगदी तंतोतंत लागू पडणारा आहे असे म्हंटले तर तसूभर ही वावगे ठरणार नाही..Shah Rukh Khan’s movie “Jawaan” showed the mirror and the sky at the same time!
हे ही वाचा
नाशिक गौरव 2023 : भव्य जिल्हास्तरीय नृत्य,समुहनृत्य व गायन स्पर्धा
Table of Contents
लेखन दिग्दर्शन
अभिनय
कोणी म्हणतंय ‘ ब्लॉकबस्टर’, तर कोणी म्हणतंय ‘मास्टर पीस’.
दिग्दर्शक ऍटलीने दक्षिण आणि उत्तरेचा सुरेख मेळ घडवत वर्तमान काळातील मुद्द्यावर मनोरंजनाच्या माध्यमातून प्रकाश झोत टाकला आहे. गुदयाच्या भाषेत मुद्द्याचं सांगताना मनोरंजक मसाल्यांचाही भरपूर वापर करण्यात आला आहे.शाहरुख खानच्या रूपात जणू भारतीय रॉबिनहूडचा डबल धमाकाच पाहायला मिळतो.अंकुश नसलेली यंत्रणा आणि यंत्रणेचा दुरुपयोग करणारे यांना एकाचवेळी आरसा आणि आसमान दाखवण्याचे काम जवान या चित्रपटाने केले आहे. Shah Rukh Khan’s movie “Jawaan” showed the mirror and the sky at the same time!
कथानक
सध्या बॉलीवूडला सुगीचे दिवस आले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला शाहरुख खानच्या “पठाण” बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवला होता. 500 कोटी पेक्षा जास्त रुपयाची कमाई केली होती.
त्यानंतर अनेक कमी बजेटच्या चित्रपटांनी ही चांगली कमाई केली होती. मग ऑगस्ट महिन्यात गदर 2 आणि OMG 2 या दोन चित्रपटांनी जवळपास 650 कोटी रुपयांचा व्यवसाय केला .गदर 2 हा चित्रपट पठाणच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्याचा जवळपास आला होता.
हे ही वाचा
मोबाईल वर निर्बंध आता नाशिक मनपा शाळांमध्ये ! परिपत्रक जारी.
चित्रपटाच्या सुरुवातीला चेहऱ्याला बँडेज गुंडाळलेली व्यक्ती आणि सहा तरुणी मेट्रो हायजॅक करतात असे दृश्य आहे. ते ट्रेनमधील साडेतीनशेहून अधिक लोकांना ओलीस ठेवतात. रेस्क्यू एक्सपर्ट पोलीस अधिकारी नर्मदा रायच्या माध्यमातून मंत्र्यांना बोलवतात. त्यांच्यामार्फत बिजनेसमन काली गायकवाड कडून 40 हजार कोटी रुपयाहून अधिक रक्कम उकळतात. ते सर्व पाहूनही ट्रेनमधील प्रवासी रेस्क्यूसाठी आलेल्या पोलिसांना मदत करणे ऐवजी अपहरन कर्त्यांना साथ देतात .इथूनच खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी संघर्ष करणारा भारतीय रॉबिनहूड आणि सहा तरुणींची कहाणी सुरू होते .पुढे एक नव्हे ,चक्क दोन नायक शक्तिशाली खलनायकाच्या नाकी नऊ आणतात.
शाहरुख खानचा जवान हा चित्रपट अष्टमी च्या दिवशी रिलीज झाला आहे.आज आपण जाणून घेऊया कसा आहे ‘जवान ‘.शाहरुख खानचा जवान चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल की नाही.
जवान चित्रपटाची गोष्ट खूपच रसपूर्ण आहे. एका सामाजिक विषयावर घेतलेली बाप लेकाची भावनिक गोष्ट आहे .परंतु याठिकाणी आम्ही तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही , नाहीतरी चित्रपट पाहण्याची मजाच कमी होईल. चित्रपटाचा स्क्रीन प्ले खूपच चांगल्या प्रकारे लिहिला गेला आहे ,ज्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. चित्रपटात नेहमीच काही ना काही तरी होत असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या सीटला बांधलेले राहतात.
हे ही वाचा
“आमच्या पप्पांनी गणपती आणलाय”.फेमस छोटा स्टार चिमुकला कोण आहे ?
त्यातच मध्यंतर च्या आधी असा एक जबरदस्त सीन येतो ,असं काहीतरी घडतं ,ज्यामुळे संपूर्ण थेटर टाळ्या आणि शिट्ट्याच्या आवाजाने भरून जातं आणि इंटरवल नंतर काय होईल हे पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचते.
मध्यंतर नंतर दिग्दर्शकाची चित्रपटावरची पकड सैल पडत नाही आणि चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. क्लायमॅक्स सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल . एकूणच चित्रपटाची गोष्ट आणि स्क्रीन प्ले खूप छान आहे,त्याचबरोबर डायलॉग सुद्धा एकदम छान आहेत ,ज्यावर शिट्टी आणि टाळ्यांचा पाऊस पडतो.
लेखन दिग्दर्शन
एस .रमनगिरीवासन यांच्या साथीने चित्रपटाचं लेखन करताना ऍटलीने कर्जबाजारी शेतकऱ्यावरील अत्याचार, सरकारी रुग्णालयांची दुरावस्था ,सैनिकांच्या जीवांशी खेळणारा शस्त्र घोटाळा , ई व्ही एम मशीन मतदानासाठी आवाहन इत्यादी महत्त्वाचे मुद्दे सादर केले आहेत ,त्यामुळे चित्रपट सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा मिनिटांमध्येच सकारात्मक मेसेज मिळतो आणि पुढे कोणता मुद्दा येईल याबाबत कुतूहल वाटतं.नायकाच्या दुहेरी भूमिकेचा अचूक वापर केला असून, चित्रपटाच्या सुरुवातीपासून खलनायकाचा दरारा जाणवतो,’ बेटे को हात लगाने से पहले…’ सारखे काही संवाद आणि नायक खलनायकाची एन्ट्री टाळ्या- शिट्ट्यांची बरसात करते .चित्रपटातील’ जिंदाबाद ‘या गाण्यासोबतच इतर गाणी चांगली झाली असून कोरिओग्राफी ही सुरेख आहे.ॲक्शन चा थरारही यात अनुभवायला मिळतो . सैनिकांनी जेलर चा गेटअप पाहिल्यावर या डिपार्टमेंट मध्ये काही उणीव राहिल्याचं जाणवत .बाकी हा चित्रपट पैसा वसूल मनोरंजन आहे.
हे ही वाचा
30 मिनिटात 1 हेक्टर जमीन मोजणी आता शक्य
शाहरुख खानचा’ जवान’ हा चित्रपट सिनेमा शानदार आहे. पैसा वसूल सिनेमा म्हटलं तरी वाव ठरणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत बॉक्स ऑफिस चा बादशाह ठरलेल्या शाहरुख क्रेझ आजही कायम आहे आणि ती लवकर संपणार नाही.
वाईट सरकारी व्यवस्थेमुळे उध्वस्त झालेल्या तरुणाची गोष्ट’ जवान ‘या सिनेमात दाखवण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा मुलगा ही स्वतःच ही यंत्रणा दुरुस्त करतो .एकंदरीतच भ्रष्टाचार विरुद्ध च्या लढाईची गोष्टी या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
गरिबांचे हक्क, शेतकऱ्यांची आत्महत्या अशा विषयावर या सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. बिघडलेल्या व्यवस्थेचा प्रश्न या सिनेमात दाखवण्यात आला आहे. योग्य नेता असण काळाची गरज आहे हा मुद्दा या सिनेमात मांडण्यात आला आहे. एक चांगला कथानक असलेला दर्जेदार सिनेमा पाहिला नसेल तर थिएटर मध्ये जाऊन जवान हा सिनेमा नक्की पहा.
कोणी म्हणतंय ‘ ब्लॉकबस्टर’, तर कोणी म्हणतंय ‘मास्टर पीस’.
शाहरुख, नयनतारा, विजय सेतुपती यांच्या ‘जवान ‘ सिनेमाचं कौतुक करताना अनेकांनी’ ब्लॉकबस्टर ‘ , ‘मास्टरपीस ‘असे शब्द वापरले आहे. शिवाय या पब्लिक रिव्ह्यू देणाऱ्या युजर्सने सिनेमाला 4 ते 5 स्टार ही दिले आहेत.
अभिनय
चित्रपटातील कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचं झालं शाहरुख खान पहिल्यांदाच साउथ इंडियन स्टाईल सिनेमांमध्ये काम करतोय आणि लार्जर द्यान लाईफ हिरोची भूमिका त्यांनी खूप चांगल्या प्रकारे वठवली आहे.चित्रपटात तो बाप आणि लेकाची भूमिका साकारतोय त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या लुकमध्ये सुद्धा तो दिसून आला आहे. त्यामुळे विविधतेत तो खूपच उठून दिसतो.एकूणच तो किंग खान का आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय.
हे ही वाचा
नाशिक महानगरपालिके मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची थोडक्यात माहिती.
अभिनेत्री नयनतारा हिने एका पोलिस ऑफिसर च्या भूमिकेत प्राण ओतले आहेत. ती खूपच सुंदर दिसते.त्याचबरोबर तिची एक्टिंग ही कमाल आहे.
अभिनेता विजय सेतूपतीला भारतातील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये का गणला जातं ,हे त्याने ‘जवान ‘ चित्रपटातून सिद्ध केलंय .त्याची एक्टिंग कमाल आहे.
चित्रपटात दीपिका पादुकोण, प्रियामणी आणि संजय दत्त यांच्याही छोट्या छोट्या भूमिका आहेत आणि त्यांनी खूप छान काम केलंय.
शाहरुख खान ने कमालीचा नायक रंगवला आहे. देहबोलीपासून संवाद फेकीपर्यंत एक वेगळाच एस आर के दिसतो .त्याच्या तोडीस तोड असलेली नायिका नयनताराच्या रूपात आहे .विजय सेतुपती जरी साउथ चा एक्टर असला तरी हिंदीतही त्याच्या मोठा चाहता वर्ग आहे .त्याने रंगवलेला खलनायक मनाचा थरकाप उडवणारा आहे.सान्या मल्होत्रा , लहेर खान ,गिरजा ओक ,प्रियमनी, संगीता भट्टाचार्य यांनी आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय दिला आहे. दीपिका पदुकोणने छोटाशा भूमिकेतही अचूक रंग भरला आहेत . क्लायमॅक्स पूर्वीची संजय दत्तची एन्ट्री आणि त्याची स्टाईल लक्षवेधी आहे इतर सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलं आहे.
चित्रपटाची सिनेमेटोग्राफी आणि ॲक्शन सीन सुद्धा कमाल आहेत आणि मोठ्या पडद्यावर पाहायला खूप मजा येते .म्युझिक डायरेक्टर अनिरुद्धचेही गाणी मोठ्या पडद्यावर पाहायला छान वाटतात. त्याने दिलेला बॅकग्राऊंड स्कोर तर कमालच आहे .अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही. या सर्व डिपारमेंट ची सांगड घालणारा मुख्य माणूस म्हणजे चित्रपटाचा दिग्दर्शक एटली कुमार .सध्या एटली कुमार तमिळ चित्रपटातील नंबर वन दिग्दर्शक समजला जातो आहे आणि ते का ,याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावर मिळतं. त्याने कमाल काम केलंय. यांनी सगळ्याकडून कमाल काम करून घेतलंय.
एकूणच शाहरुख खानचा जवान हा फुल फॅमिली एंटरटेनमेंट धमाका आहे. जो प्रत्येकाला एंटरटेन करेल, एक चांगला मेसेज देईल ,त्यामुळे या वीकेंडला तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये नक्की पाहू शकता .
तुम्ही जवान चित्रपट पाहिला का ? तुम्हाला आवडला का ? नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्की वाचा.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680