सुकन्या समृद्धी योजना ssy scheme ही महिला सबलीकरण दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल ठरले असून तळागाळातील उर्वरित लाभार्थ्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा या दृष्टिकोनातून सर्व केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक यांनी आपल्या अधिनस्त शाळेतील योजनेची लाभार्थी निश्चित करण्यासाठी ,भारतीय पोस्ट विभागाने त्यांच्या संबंधित कार्यालयाकडून पत्राद्वारे सर्व शाळांना याबाबत कार्यवाही करण्यासाठी पत्र दिले आहे. भारतीय टपाल विभागाच्या माहितीनुसार तसेच केंद्रीय मंत्रालय शालेय व साक्षरता विभाग यांच्या पत्रांना अनुसरून दिनांक 9 व 10 फेब्रुवारी या दिवशी सुकन्या समृद्धी योजना (ssy scheme) खाते उघडण्याची विशेष मोहीम भारतीय टपाल विभागामार्फत भारतभर राबवली असून त्या अंतर्गत देशभरात ११,००,००० पेक्षा जास्त खाती उघडली गेली आहेत.
सुकन्या समृद्धी योजना : महिलांचे सबलीकरण व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने या योजनेला शुभारंभ केला आहे त्यास जनमानसातून पाठिंबाही मिळत आहे. सदर योजनेचा लाभ दहा वर्षाच्या आतील वयोगटाच्या मुलींना घेता येईल. तसेच सुरुवातीला कमीत कमी रुपये 250 भरून खाते सुरू करता येऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आठ टक्के असा आकर्षक व्याजदर भारतीय टपाल विभागामार्फत देण्यात येत आहे. दरवर्षी आर्थिक वर्षात कमीत कमी रुपये 250 आणि जास्तीत जास्त रुपये 1 लाख 50 हजार या खात्यावर जमा करता येऊ शकतात. आणि सदर खात्यावर जमा केलेल्या रकमेवर आयकारात 80 C अंतर्गत सूट मिळते.
सोबत मिनिस्ट्री ऑफ फायनान्स न्यू दिल्ली यांचे संदर्भ दिनांक 1 /3/2023 आणि 1/ 4 / 2023 ते 30/ 6 /2013 या कालावधीसाठी पोस्टातल्या विविध खात्यावर व्याजदर काय असतील याचे पत्रक सोबत जोडले आहे.
योजनेचे नाव : सुकन्या समृद्धी योजना
वर्ष : 2023
लाभार्थी : शून्य ते दहा वर्षे वयोगटातील मुली
गुंतवणूक रक्कम : कमीत कमी 250 रुपये जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपये, एकूण कालावधी 15 वर्ष
कुटुंबात एकूण किती खाते काढू शकतात :
फक्त दोन मुली, जर पहिल्या मुलीनंतर दुसऱ्या मुलीबरोबर जुळी मुलगी झाली असेल तर तीन मुलींचे खाते उघडू शकतो.
परिपक्वता कालावधी : 21 वर्षे
सुकन्या समृद्धी योजनेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत ते खालील प्रमाणे
सुकन्या योजनेत कमीत कमी 250 रुपयेवर्षाला जमा करावे लागत होते परंतु आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता जर आपण एखाद्या वर्षी कमीत कमी रक्कम 250 रुपये काही कारणास्तव जमा करू शकलो नाही तरीही आपल्या मिळणाऱ्या मॅच्युरिटी रकमेच्या व्याजदरात कोणताही बदल होणार नाही म्हणजेच आपणास डिफॉल्टर घोषित करण्यात येणार नाही.
सुकन्या समृद्धी योजनेत आपण दोनच मुलींचे खाते उघडू शकतो, परंतु तिसऱ्या मुलीचे खाते ही उघडण्याची तरतूद होती परंतु या खात्याचा इन्कम टॅक्स सेक्शन 80 C मध्ये लाभ मिळणार नाही. नव्या बदला नुसार आता तिसऱ्या मुलीलाही सेक्शन ८० C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळेल.
सुकन्या समृद्धी योजना पूर्वी दोन कारणामुळे बंद केले जाऊ शकत होते. एखाद्या मुलीचा मृत्यू झाला तर आणि दुसरा एखादी मुलगी परदेशात लग्न होऊन गेली तर त्यावेळी. परंतु आता या नव्या नियमांत बदल केले आहेत आता या योजनेचे खाते काही इतर कारणामुळे ही बंद होऊ शकते. ते म्हणजे एखाद्या मुलीच्या आई वडिलांचा मृत्यू झाला तर आणि दुसरे म्हणजे एखाद्या मुलीला भयंकर आजार झाला तर खाते बंद होऊ शकते.
दुसरा बदल म्हणजे पूर्वी कोणतीही मुलगी दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते अपडेट करू शकत होती तर आता या नियमात बदल झालेला आहे आता कोणतीही मुलगी 18 वर्षे झाल्यावरच खाते ऑपरेट करू शकणार आहे.
Sukanya samriddhi Yojana details 2023
या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी जास्तीत जास्त वय 10 इतके असणार आहे.
SSA मध्ये एकूण पंधरा वर्षेपर्यंत रक्कम जमा करता येते त्याचा परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे.
वर्षाला कमीत कमी रक्कम 1000 आहे तर जास्तीत जास्त रक्कम ही दीड लाख आहे.
सध्या योजनेतील रकमेला 8 टक्के व्याज आहे.
या योजनेचा हप्ता महिन्याला भरत असाल तर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला भरला पाहिजे आणि वर्षाला भरत असाल तर 1 एप्रिल ला भरावा लागतो.
मुलीचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर तिच्या उच्च शिक्षणासाठी 50% रक्कम काढण्याचा पर्याय आहे.
या योजनेचे खाते आपण दुसरीकडे ही वळवू शकतो.
योजनेचा लाभ दत्तक मुलींसाठीही घेता येतो.
मुलगी कळती झाली तर खाते स्वतः चालवू शकते हा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे.
सुकन्या समृद्धी योजना कुठे उघडावी ?
सर्वसाधारणपणे ही योजना पोस्ट ऑफिस मध्ये उघडली जाते, परंतु सरकारी बँकेमध्ये खाते उघडून सुद्धा गुंतवणूक करता येते. काही बँकांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत.
बँक ऑफ बडोदा
भारतीय स्टेट बँक
पंजाब नॅशनल बँक
बँक ऑफ इंडिया
इंडियन बँक
पोस्ट ऑफिस
सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
जर आपल्या मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत काही गुंतवणूक करून इच्छिता तर त्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे, ही कागदपतत्रे घेऊन बँकेत किंवा पोस्टात जाऊन खाते उघडू शकता.
SSY scheme मध्ये खाते उघडण्यासाठी जन्म दाखला आवश्यक आहे.
आई-वडिलांचे आधार कार्ड,पॅन कार्ड
मुलीचे वय दहा वर्षापेक्षा जास्त असले नाही पाहिजे.
सुकन्या समृद्धी योजनेत पैसे कैसे जमा करावेत ?
सुकन्या समृद्धी योजनेत पंधरा वर्षे पैसे जमा होणार आहेत. म्हणून आपण सर्वांना माहीती पाहिजे की पैसे कसे जमा होतात. जर महिन्याचा हप्ता असेल तर प्रत्येक महिन्याला 1 असे 12 हप्ते रक्कम जमा करावी लागते. म्हणून आपण सोप्या पद्धतीने कसे जमा करू शकता यावर भर देणार आहोत.
रोख रक्कम
डी.डी
चेक
ऑनलाईन (उपलब्ध असेल तर)
अशाप्रकारे केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ तळागाळातील कुटुंब घेऊ शकते आणि मुलींचे भविष्य उज्वल बनवू शकते.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680