नाशिक:- नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 22 धृवनगर परिसरात आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 22 मध्ये विविध प्रकारचे उपक्रम साजरे करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून ध्रुवनगर शाळा क्रमांक 22 मध्ये बुधवार दिनांक 28 जून 2023 ला आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली.This issue is discussed in Dhruvnagar area
नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 22 मध्ये बहुतांश विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेत आलेले होते.या दिंडी मागचा हेतू हा होता की, आपली भारतीय संस्कृती,परंपरा, व वारकरी सांप्रदायाची संस्कृती कायम टिकली पाहिजे,हे संस्कार विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित आहे म्हणून ही दिंडी काढण्यात आली होती. This issue is discussed in Dhruvnagar area
मनपा शाळा क्रमांक 22 या शाळेची दिंडी संपूर्ण धृवनगर परिसरात काढण्यात आली होती. उत्कृष्ट वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचे धृवनगर परिसरातील लोकांनी त्यांच्याबरोबर फोटो काढले व सेल्फी ही काढल्या. काही लोक इमारती वरून फोटो व व्हिडिओ काढत होते.यातील काही विद्यार्थी संत जनाबाई, वारकरी,संत व विठ्ठल-रुक्मणी यांची वेशभूषा करून आले होते.
या दिंडीचा YouTube वरील व्हिडी पाहण्यसाठी इथे क्लिक करा
सर्व विद्यार्थी विठ्ठल नामाचा गजर करत करत दिंडीमध्ये पुढे जात होते. बहुतांश विद्यार्थिनींनी तुळशीचे रोप डोक्यावर ठेवून दिंडीत सहभाग घेतला होता. ज्ञानोबाची पालखी फुग्यांनी सजवण्यात आली होती व ज्ञानदेवाची पूजा करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनी फुगडी चा आनंद घेतला.This issue is discussed in Dhruvnagar area
नाशिक मधील धृवनगर परिसरात अवघी पंढरी अवतरलेली दिसून येत होती. विद्यार्थी छोट्या छोट्या हातांनी टाळ वाजवत असलेले दिसत होते, गिरक्या घेत असलेले दिसून येत होते. सर्व विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षिका ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ याचा गजर करत होते. या वातावरणात वेगळाच उत्साह अवतरलेला होता. पावसाची रिमझिम थोडी थोडी चालू होती. तरीही ती दिंडी सातत्याने पुढे चालत होती. या दिंडीमुळे शाळा प्रवेशासंबंधित जागृती सुद्धा करण्यात येत होती . त्या ठिकाणी बालगोपाळांचा आनंद खूपच वेगळा होता. या दिंडीचे खूप सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते.
लोक म्हणतात पंढरीची वारी पाहण्यासाठी पंढरपूरलाच जावं लागतं. पण या चिमुकल्यांची ध्रुवनगर ठिकाणी पंढरपूरची दिंडी अवतरली होती. धृवनगर मंदिरात सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री.श्यामभाऊ गव्हाणे यांची तेथे भेट झाली. This issue is discussed in Dhruvnagar area
त्यांनी म्हटले की, या छोट्या मुलांमुळे आम्हाला पंढरीच्या वारीचा अनुभव घेता आला. विद्यार्थ्यांमध्ये विठ्ठला विषयी प्रेम वाढत जात आहे. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये धार्मिकतेचा विषय मांडला जात आहे. धृवनगर शाळा क्रमांक 22 यांचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. मी त्यांना माझ्या मंदिराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. असे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री.श्यामभाऊ गव्हाणे म्हणाले.
सर्व शिक्षक,मुख्याध्यापक व विद्यार्थी सक्रिय सहभागी होऊन कार्यक्रमाची अंमलबजावणी करत असतात. मुले स्वइच्छेने सहभागी होत असतात. धृवनगर परिसरात या आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या दिंडीची भरपूर चर्चा झाली असे समजते.

Writer,Activenama