नाशिक : नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगरमध्ये 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी बाल गोपाळासह पार पडला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षीही हा दिवस नववा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये साजरा करण्यात आला.त्यापैकीच एक शाळा म्हणजे मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर,सातपूर कॉलनी सातपुर.

योगशास्त्र ही भारतीयांनी जगाला दिलेली एक देणगी आहे आणि हे जगाने सुद्धा मान्य केलेले आहे,म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाचे महत्त्व लक्षात घेऊन 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हास्तर,तालुकास्तर,महानगरपालिका स्तर या विविध स्तरावर साजरा करण्यात आला. यामध्ये महानगरपालिका शाळामध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि योगांचा लाभ घेतला.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ते १०वी तील सर्व विद्यार्थ्यांनी योग दिनाची तयारी म्हणून घरातून येताना बसण्यासाठी चादर,सतरंजी सोबत घेऊन ते आले होते. त्यांच्यासोबत शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनीही सहभाग नोंदवला. प्रत्येक शाळेत योगाचे महत्त्व सांगण्यात आले. आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात आपण कोण कोणती योगासने केली पाहिजेत याची सविस्तर माहिती सांगण्यात आली.
प्रत्येक शाळेतून एक किंवा दोन योगशिक्षकांची निवड मुख्याध्यापककडून करण्यात आलेली होती. त्यास इतर शिक्षक व शिक्षिकांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष योगासनाचा आनंद घेतला. Balgopal indulged in yoga in the municipal area of Dhruvnagar with municipal school महानगरपालिका शाळा क्रमांक 22 धृवनगर मध्ये उपशिक्षक श्री ईश्वर चौरे व उपशिक्षक संतोष महाले यांनी योगशिक्षक म्हणून मुलांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सोनजी गवळी यांनी सर्व शिक्षक व विद्यर्थ्याना योग दिनाबाबत मार्गदर्शन केले.बाकी च्या शिक्षकांनी अर्थात लता सोनवणे,कल्पना पवार,नामदेव जानकर, दिपाली काळे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
Balgopal indulged in yoga in the municipal area of Dhruvnagar with municipal school

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680