Good news! For Parents in Nashik Metropolis !! Nashik Municipal schools are now “smart schools”, they will get a lot of facilities!!! Is a school in your area on this list?
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागा मार्फत, नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. च्या निधी अंतर्गत स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी मे पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पॅलेडियम) यांची स्मार्ट शाळा अमलबजावणीसाठी सल्लागार सेवा पुरविण्याकरिता “सल्लागार” म्हणून नाशिक महानगरपालिकेकडून नेमणूक करण्यात आलेली आहे.
तसेच नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांचे मार्फत नाशिक महानगरपालिकेच्या निवडक शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्पाची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सामान्य घरातील विद्यार्थी शिकत असतात. आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. मोठमोठ्या खाजगी शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या खाजगी शाळांचा खर्च सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर असतो,त्यामुळे त्या शाळा सामान्य लोकांना परवडणा-या नाहीत. मनपा शाळांमध्ये शिकत असणाऱ्या या विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञान असणाऱ्या सुविधांच्या अभावांशी नेहमी सामना करावा लागत होता. परंतु स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत स्मार्ट स्कूल प्रकल्प राबवला गेल्यामुळे सामान्य लोकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. ही गोष्ट नाशिक महानगरातील पालकांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या शाळांमध्ये खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात येत
आहेत.
स्मार्ट क्लासरूम (६५६) : ७५ इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल, डिजिटल कन्टेन्ट, लॅन कनेक्टिव्हिटी, ग्रीन बोर्ड, सॉफ्ट पिन बोर्ड, विद्यार्थी बेंच, शिक्षक टेबल, शिक्षक खुर्ची, डस्टबिन, एलईडी ट्यूब लाइट्स, छतावरील पंखे, रंगकाम
संगणक प्रयोगशाळा (६९) : २० डेस्कटॉप संगणक १ हाय-एंड संगणक (स्थानिक सहर), प्रिंटर, LAN कनेक्टिव्हिटी, नेटवर्क रॅक विंडोज ओएस, मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर, एअर कंडिशनर, अग्निशामक यंत्रे, ग्रीन बोर्ड, सॉफ्ट पिन बोर्ड, कॉम्प्युटर टेबल, खुर्ची, शिक्षक टेबल, डस्टबिन, शू रॅक, रंगकाम
मुख्याध्यापक कक्ष (६९) : २ डेस्कटॉप संगणक, Android टॅब्लेट, प्रिंटर सीसीटीव्ही कॅमेरा फीडचे निरीक्षण करण्यासाठी ३२” एलईडी टीव्ही, संगणक टेबल, संगणक खुर्ची, डस्टबिन, रंगकाम शालेय स्तर (६९) : क्लाउड आधारित शाळा प्रशासन सॉफ्टवेअर, २००Mbps च्या किमान गतीसह ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा.
नाशिक महानगरपालिकेच्या स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत निवडलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांच्याकडून अभिमुखता प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापकांना स्मार्ट स्कूल विषयी आणि त्याअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल विस्तृत माहिती देण्यात येईल. तसेच त्याबाबतीत मुख्याध्यापकांना असलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील, जेणेकरून आपापल्या शाळांमध्ये त्यांना स्मार्ट स्कूल प्रकल्प यशस्वीरीत्या राबविता येईल.
हा कार्यक्रम काठे गल्ली येथील मनपा शाळा क्रमांक ४३ येथे आयोजित करण्यात येणार आहे.
एकूणच मनपा शाळांसाठी आणि पालकांसाठी स्मार्ट स्कूल ही संकल्पना खाजगी शाळा आणि मनपा शाळा यांच्यामधील दरी भरून काढण्यासाठी मदत होणार आहे.
म्हणतात ना ? ” खुदा जब भी देता है तो छप्पर फाडके देता है” l अशी परिस्थिती मनपा च्या शाळांबाबत घडताना दिसत आहे.

Writer,Activenama