नाशिक मधील सातपूर भागातील धृवनगर येथे शुक्रवार रोजी दुपारी रस्त्यावरील विजेच्या तारांना मालगाडीच्या वरचा भाग तारांना अडकून विजेचा खांब वाकला व परिसरात मोठा आवाज होऊन ठिणग्या पडून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धृवनगर परिसर, जो भाग मनपा शाळा क्रमांक 22 च्या समोर येतो, त्या कॉलनी रस्त्यावरून एक मालगाडी गेली व तिचा भाग वर असलेल्या रस्त्यावरील विजेच्या खांबाच्या ताराला लागल्याने मालगाडीच्या धक्क्याने खांबावर ताण येऊन तो वाकला. त्याचबरोबर परिसरात मोठा आवाज होऊन, ठिणग्या पडून सर्व विजेच्या ताराचा वीज पुरवठा त्या भागातील बंद पडला.
नेमके घरातील कोणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले किंवा झाले नाही याबाबत वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतरच कळणार आहे. अचानक लाईट गेल्याने व बराच वेळ लाईट न आल्याने लोकांनी चौकशी करायला सुरुवात केली,त्यावेळी हे लक्षात आले.
धृवनगर भागातील परिसरात भूमिगत केबल आहेत पण काही ठिकाणी त्या वरून आहेत. जिथे कॉलनी रस्ते आहेत तेथे मालगाड्या येतील अशी अपेक्षा न ठेवल्याने तिथेच हे लाईटच्या खांबावरील तारा आहेत. यावेळी मोठा आवाज झाल्याने घटनास्थळाच्या आजूबाजूला राहणारे नागरिक त्या ठिकाणी गोळा झाले. वार्डाचे नगरसेवक दिनकर आण्णा पाटील यांच्या माध्यमातून लगेच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधल्याने लवकरच नुकसान झालेल्या ठिकाणी तारा बदलण्याच्या व खांब बदलण्याच्या कामाला गती आली . संध्याकाळी बराच वेळ खांब बसवणे व नवीन तारा बसवण्याचे काम सुरू होते. गाडीच्या चालका विषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680