वीज मीटरला ही मोबाईल सारखे रिचार्ज
Table of Contents
तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगती करत आहे, त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील जनतेवर त्याचा प्रभाव पडणार आहे हे निश्चित.आता मोबाईलचे प्रीपेड व पोस्टपेड कनेक्शन महावितरण आणणार आहे. मोबाईलचे प्रीपेड कनेक्शन म्हणजेच ग्राहकांना अगोदरच पैसे भरून वीज मीटर रिचार्ज करावे लागणार आहे. त्यामुळे महावितरणाचा कोणता फायदा होणार आहे ? पुढे आपण पाहणारच आहोत.Now the electricity meter has to be recharged like a mobile phone?
हे ही वाचा
तुम्ही जेवण करीत आहात आणि अचानक लाईट गेली तर वावगे समजू नका.असे ही होऊ शकतं की आपण विजेच्या मीटरचा रिचार्ज करायला विसरून जाऊ शकतो. पण यापुढे असे चालणार नाही. लवकरच आपल्या घरचे मीटर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. मीटरच्या अकाउंट मध्ये जोपर्यंत पैसे आहेत,तोपर्यंत लाईट उजेड देणार आहे आणि ज्यावेळी पैसे संपतील त्यावेळी अंधार होणार आहे. तसेच पोस्टपेड कनेक्शन सुद्धा असणार आहे. दोन्हीपैकी एकाची निवड आपल्याला करावी लागणार आहे.
27 महिन्यात हे मीटर बदलण्यात येणार असल्याचे समजते.
महावितरण या कंपनीने निविदा वितरित केलेल्या असून अदानी समूहासह इतर चार कंपन्यांनी स्वीकारपत्र जारी केलेले आहे. या कंपन्यावर महाराष्ट्रातील ग्राहकांची मीटर बदलवून प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या मीटरच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च काही वर्षे या कंपनीकडेच असणार आहे.
हे ही वाचा
आता आपली आवडती स्प्लेंडर इलेक्ट्रिक अवतारात ; इतकी असणार किंमत.
सर्वाधिक काम अदानी समूहाला मिळाले आहे असे महावितरण कडून समजते. आपल्या सर्वांना माहीत आहे की,महावितरण कंपनी सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावावर एक महिन्याच्या बिलाचे पैसे स्वतःकडे ठेवते पण आता स्मार्ट मीटर कंपनीकडून बसवल्यानंतर हे सिक्युरिटी डिपॉझिट कंपनी घेणार किंवा घेतलेले परत करणार याबाबत उत्सुकता आहे.
खऱ्या अर्थाने विजेची चोरी व गळतीला प्रतिबंध करण्यासाठी महावितरण राज्यात सत्तावीस हजार फीडर व चार लाख ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा स्मार्ट मीटर बसवणार आहे असे समजते. लवकरच म्हणजे साधारण तीन ते चार महिन्यात मीटर बदलण्याचे काम सुरू होईल. Now the electricity meter has to be recharged like a mobile phone?
हे ही वाचा
मात्र नवीन जोडणीसाठी पुढील महिन्यापासूनच स्मार्ट मीटर ग्राहकांना देण्याचे आदेश आहेत. या मीटरचा वीज कंपनीला फायदा होणार आहे, कारण थकबाकीची समस्या पूर्णपणे संपणार आहे. अशाप्रकारे महागाईने ग्रासलेल्या जनतेस अजून एक झटका बसणार आहे.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680