आज काल जगात अनेक असे घोटाळे होत आहेत. त्यातल्या त्यात सर्वात जास्त सायबर गुन्हेगारांकडून केले जाणा-या गुन्ह्यामार्फत लोक जास्त शिकार झाले आहेत. तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस अद्यावत होत चालले आहे. आणि तंत्रज्ञान जेवढे अद्यावत होत राहील,पुढे जात राहील तेवढे सायबर गुन्हेगार सुद्धा नवीन नवीन युक्त्या शोधत राहतील. हे थांबणार नाही परंतु आपण जागरूक राहणे खूप महत्त्वाचे आहे. How Does Juice Jacking Scam Happen? Let’s get information about this!
हे ही वाचा
Juice jacking scam हा घोटाळा मोबाईल लॅपटॉप सारख्या साधनांमधून लोकांचा महत्त्वाचा डेटा किंवा माहिती चोरून त्याचा गैरवापर करण्याच्या संदर्भातील आहे. गुन्हेगारांनी काय युक्ती शोधून काढलेली आहे पहा.
Juice jacking scam मध्ये पासवर्ड, क्रेडिट कार्ड क्रमांक किंवा बँकिंग क्रेडेन्शियल यांसारखी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप मधून काढून घेण्यात हे लोक यशस्वी ठरतात.
ज्यूस जॅकिंग घोटाळा Juice jacking scam काय आहे? कसा होतो? How Does Juice Jacking Scam Happen? Let’s get information about this!
हे ही वाचा
फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी|पनवेल महानगरपालिकेत 377 पदांकरिता भरती |संधी चुकवू नका.
अनेकदा आपण घरातून बाहेर निघाल्यानंतर मोबाईलची चार्जिंग संपल्यानंतर आपण बाहेर असल्यामुळे आपण चार्जिंग कुठेही लावत असतो. असे तुम्ही करत असाल, तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.ते तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुम्हाला वाटत असेल की हे असं का सांगतात? तर त्या मागचं कारण हे आहे की, या प्रकारचा घोटाळा करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक स्थानांवर चार्जिंग लावले आहेत त्या चार्जिंग स्टेशनवर मालवेअरसह सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर इन्स्टॉल केले जाते. म्हणून सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मोबाईल किंवा Laptop लावताना अधिक विचार करणे आवश्यक आहे.बेसावधपणा ही चूक कृपया करू नका. ती खूप महागात पडू शकते. सार्वजनिकच काय ,आपला ज्याच्यावर विश्वास आहे असे वाटते, तो सुद्धा असे करू शकतो.
सध्या गुन्हेगारांनी juice jacking scam च्या माध्यमातून लोकांना शिकार करून लुबाडत आहेत. रिझर्व्ह बँकेने लोकांना अशा गुन्हेगारांपासून सावध राहण्यास सांगितले आहे.
Juice jacking scam हा मोबाईल व लॅपटॉप यांसारख्या साधनांपासून महत्त्वाचा लोकांचा डेटा चोरून त्यांचा गैरवापर काही सायबर गुन्हेगार करत आहेत. हे गुन्हेगार USB पोर्ट किंवा सार्वजनिक चार्जिंग स्टेशन यांद्वारे सायबर गुन्हेगार लोकांची या scam मध्ये शिकार करतात.
हे ही वाचा
लक्षात ठेवा पण मोबाईलचा चार्जिंग पोर्ट फाईल किंवा डेटा ट्रान्सफर साठी देखील वापरला जाऊ शकतो. सायबर गुन्हेगार तिथे चार्जिंग करण्यासाठी दिलेल्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये malware transfer करण्यासाठी सार्वजनिक चार्जिंग पोर्टचा वापर हल्ली करतात हे अलीकडे दिसून येत आहे. त्या व्यक्तीच्या मोबाईल फोनवरून save केलेले पासपोर्ट, e-mail, SMS इत्यादी महत्त्वाच्या डेटावर नियंत्रण मिळवतात किंवा प्रवेश डेटा चोरतात.
Juice jacking scam मधून लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. जमा केलेल्या devices मधून अत्यंत महत्त्वाची माहिती जसे की पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर, किंवा बँकिंग क्रेडेन्शियल हे चोरून तुमच्या मोबाईल मधील आर्थिक खात्यामध्ये रीतसर प्रवेश मिळवण्यासाठी यांचा वापर करू शकतात.
या गुन्हेगारांपासून कृपया सावधगिरी बाळगा व चार्जिंग करण्यासाठी कोणत्या ही सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर जाताना सावधगिरी बाळगा. त्याचबरोबर कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या घरामध्ये मोबाईल चार्जिंगला लावण्यापूर्वी थोडीशी चौकशी आपण केली पाहिजे .कुठे यूएसबी पोर्ट लावलेला आहे का पाहिलं पाहिजे. प्रवासात किंवा इतर ठिकाणी आपला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी पावर बँक किंवा आपला स्वतःचा मोबाईल चार्जिंग असणे आवश्यक आहे.
हे ही वाचा
माझी कन्या भाग्यश्री योजने बद्दल संपुर्ण माहिती जाणून घ्या…| Majhi Kanya Bhagyashri Yojana
आपण जर स्वतः काळजी घेतली तर आपण निश्चितच अशा घोटाळ्यापासून सायबर गुन्हेगारापासून सुरक्षित राहाल.
Writer,Activenama