पिन न टाकताच करता येणार व्यवहार ; Google pay ने लॉन्च केले हे नवीन फीचर.

आजचे युग हे डिजिटल युग आहे. मोबाईल ने डिजिटल क्रांतीची सुरुवात केली आहे.अँड्रॉइड मोबाइल आल्यापासून तर डिजिटल युगाचे एव्हरेस्टच  गाठले आहे असे म्हणता येईल. कोरोना काळापासून डिजिटल पेमेंट वर लोकांनी अक्षरशः उड्या टाकायला सुरुवात केली.अलीकडच्या काळात Phonepe,Paytm बरोबरच अजूनही काही सेवांचा वापर लोक करत असलेले दिसून येतात.

त्यापैकी जगातील इंटरनेट क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली कंपनी Google  ने Google pay ही सेवा सुरू केल्यानंतर आता UPI Lite सेवा त्यांच्या व्यासपीठावरून सुरू केली आहे. गुगल पे या अँड्रॉइड app वर क्लिक केल्यानंतर आपल्याला UPI Lite चा ऑप्शन दिसेल. या फीचर मुळे लहान रकमेचे पेमेंट जलद आणि सोपे होणार आहे.

हेल्थ इन्शुरन्स काढताना कोणती काळजी घ्याल ? नक्की पहा हा व्हिडीओ

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने या सेवेचे डिझाईन केले आहे. 2022 मध्ये रिझर्व बँकेने UPI Lite फीचर लॉन्च केलेले आहे. गुगल पे ने सुरुवात केलेल्या UPI Lite  या फीचर मुळे वापरकर्त्याला एका वेळी फक्त दोनशे रुपये पिन न टाकता ट्रान्सफर करता येणार आहेत. जिथे जलद  पेमेंट करणे गरजेचे असते तिथे या 

UPI फिचर चा लाभ होणार आहे. उदाहरणार्थ किराणा दुकान, तिकीट खिडकी, बस किंवा रेल्वे मध्ये फेरीवाल्याकडून खरेदी करताना याचा उपयोग होणार

 आहे.

Google map च्या चुकीमुळे एकदा काय घडले नक्की व्हिडिओ पहा

UPI Lite हे फीचर अनेक लोक आज वापरत असल्याने त्याचे समाधान ही लोकांना मिळत आहे. गुगल पे कंपनीचा उद्देश हा आहे की पेमेंट मध्ये गतिमानता यावी,विश्वास वाढावा. हे फिचर  जरी Google pay चे असले,

 तरी या कोअर बँकिंग प्रणालीशी याचा संबंध नाही. वॅलेट सारखे जास्तीत जास्त दोन हजार रुपये यामध्ये ऍड करता येतात व जास्तीत जास्त दोनशे रुपये एकाच वेळी पे करता येतात. दिवसातून दोन वेळा दोन हजार रुपये पर्यंतची रक्कम Add करता येते.

पेटीएम,फोन पे यांनी हे  फिचर आणल्यानंतरGoogle pay ने सुद्धा यांच्या प्लॅटफॉर्मवर हे फिचर आणले आहे. Google pay ने UPI Lite हे फिचर आणल्यानंतर गुगल पे चे उपाध्यक्ष ambarish Kenghe म्हणाले की, गुगल पे मध्ये यूपीआयची उपयुक्तता  वाढवण्यासाठी NPCI आणि आरबीआय सह भारत सरकार सह भागीदारी केल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. डिजिटल पेमेंट सेवेला अधिक वेगवान,जलद बनवण्यासाठी या UPI Lite फीचर चे महत्व खूप आहे. वापरकर्त्याला सोयीस्कर,सोपी पेमेंट पद्धती मिळावी हा उद्देश कंपनीचा आहे. लोकांना लहान लहान व्यवहारासाठी पिन टाकावे लागतात, त्यामुळे बराच वेळ वाया जातो. व्यवहारात गतिमानतेला खिळ बसते. लोकांना व्यवहार किचकट वाटतात हे होऊ नये म्हणून Google Pay ने  अद्यावतता आणली आहे.

Leave a Comment