आजचे युग डिजिटल युग आहे. अँड्रॉइड मोबाईल आणि आपले नाते काहीसे अती जवळचे होऊन बसले आहे. भारतामध्ये जवळजवळ 90% लोकांकडे आज अँड्रॉइड मोबाईल आहे असे दिसून येते. अँड्रॉइड मोबाईल मुळे लोक आज जास्तीत जास्त ऑनलाईन हे असतातच. कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया ॲप्सशी किंवा वेबसाईट शी ते जोडले गेलेले असतात. हे सर्व करत असताना आपण फक्त त्याचा वापर कसा करायचा हे शिकलो. त्यावर सायबर अटॅक झाला तर याला आपण कसे तोंड देणार हे आपण शिकलो नाही. Know What is Nashik Cyber Police’s “Cyber Dut” Initiative: Appreciation is pouring in from Maharashtra.
हे ही वाचा
थोडक्यात आपल्यामध्ये सायबर साक्षरता दिसून येत नाही. तंत्रज्ञान जेवढे विकसित होत गेले तसे, त्याचा गैरवापर करणारे वाईट लोक ही अनेक युक्त्या वापरून लोकांना ऑनलाईन यंत्रणेद्वारे फसवत आहेत. याची जनजागृती आपल्यामध्ये पुरेशी नाही. याचाच फायदा इंटरनेटवर फसवणारे लोक घेत आहेत. आजकाल प्रत्येक दहा गुन्ह्यापैकी चार गुन्हे सायबर चे गुन्हे आहेत. इतका हा विषय मोठा होत आहे. आपण तंत्रज्ञान वापरत असताना काय काळजी घेतली पाहिजे याची जनजागृती होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नाशिक सायबर पोलिसांनी एक संकल्पना,एक योजना राबवली आहे,त्या योजनेचे नाव आहे “सायबर दूत” योजना. Know What is Nashik Cyber Police’s “Cyber Dut” Initiative: Appreciation is pouring in from Maharashtra.
नाशिकचे पोलीस आयुक्त मा.अंकुश शिंदे यांनी रेडिओ मिरचीला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते की, भारतातील 90% पेक्षा जास्त लोक मोबाईलचे वापरकर्ते आहेत. अलीकडच्या काळात सेक्सटोरशन पासून ते फिशिंग पर्यंत प्रत्येक गुन्हे वेगवेगळ्या युक्त्या वापरून सायबर गुन्हेगार करत आहेत. याबाबत प्रत्येकाने जागृत होणे आवश्यक आहे. आपला स्वतःचा बचाव करत असताना इतरा मध्ये सुद्धा जनजागृती करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा.
त्यासाठी “सायबर दूत” ही संकल्पना आम्ही अमलात आणायची ठरवली. शालेय विद्यार्थी यामध्ये सहभागी करून आम्ही घेतले आहेत असे ते बोलत होते. प्रत्येक वर्गातून काहीच विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी निवडण्यात येत असतात. अपेक्षा अशी आहे की त्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना याबाबत सांगावे. अशी माहिती ज्ञान आम्ही त्यांना देतो. शिक्षकांनाही आम्ही प्रशिक्षण देतो. अपेक्षा अशी आहे की त्यांनी सुद्धा लोकांना माहिती सांगावी, योगदान द्यावे . Know What is Nashik Cyber Police’s “Cyber Dut” Initiative: Appreciation is pouring in from Maharashtra.
आमच्या या योजनेचे नाव आहे “सायबर दूत”. दोन ते तीन दिवसाचा एक कोर्स आम्ही डिझाईन केलेला आहे. यामध्ये त्यांना प्रशिक्षण देऊन आमच्याकडून प्रमाणपत्रही देण्यात येते. चार ते पाच महिन्यानंतर नाशिक सायबर पोलिसांकडून एक आढावा घेण्यात येणार आहे की, “सायबर दूत” म्हणून तुम्ही किती लोकांना याची माहिती दिलेली आहे ?ऑगस्टच्या शेवटपर्यंत एक हजार “सायबर दूत” तयार करण्याचा नाशिक सायबर पोलिसांचा मानस आहे. आतापर्यंत 390 “सायबर दूत” ना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या उपक्रमात शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल यासाठी नाशिक सायबर पोलिसांनी त्यांच्या वेबसाईटवर एक ओपन लिंक दिलेली आहे. लिंक वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून कोणत्याही विद्यार्थ्यास, शिक्षकास या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. इतकी सोपी पद्धत सहभागी होण्यासाठी केलेली आहे. असे माननीय आयुक्त अंकुश शिंदे बोलत होते.
हे ही वाचा
महानोकरभरती जाहिरात | महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जाहिराती फक्त एकाच ठिकाणी | अर्ज करा.
या उपक्रमाबद्दल राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सायबर जागृती काळाची गरज आहे. गुन्हेगार आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या जवळ पोहोचायला जास्त वेळ नाही, त्यामुळे सायबर साक्षरता जरुरी आहे. नाशिक सायबर पोलिसांनी ही एक चांगली संकल्पना अंमलात आणावयास सुरुवात केली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680