आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल ! काय AI लेखन क्षेत्रातील लोकांना ही ठरणार उपयोगी ?

सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) त्याच बरोबर chat GPT ची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.ब -याच क्षेत्रांमध्ये याचा वापर अलीकडे होऊ लागलेला आहे. त्यामुळे सगळीकडे कामांमध्ये गतिमानता येत आहे. मग Google यामध्ये कसे मागे राहणार ? गुगलने सुद्धा आपले स्वतःचे Google चे AI तंत्रज्ञान आणले आहे. त्यामुळे आता लेखन करणाऱ्यांसाठी ही त्याचा महत्त्वाचा उपयोग होणार आहे.Maximum of modern technology! Will this be useful to people in the AI writing field?

हे ही वाचा

महानोकरभरती जाहिरात | महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जाहिराती फक्त एकाच ठिकाणी | अर्ज करा.

        AI च्या वापराच्या चाचण्या शैक्षणिक, ग्राहकपयोगी सेवा,उद्योग,आणि मनोरंजन या क्षेत्रात झाल्या आहेत. AI ची चाचणी प्रसार माध्यमाच्या वृत्तविभागातही झाली आहे असे दिसून येते. वॉशिंग्टन येथे नुकतेच Google चे स्वतःचे नवीन तंत्रज्ञानावर आधारित genesis सादर केले होते . याद्वारे लेखन करणे सहज शक्य होणार आहे. याचा सर्वात जास्त फायदा लेखन करणाऱ्यांसाठी होणार आहे व त्याच बरोबर वृत्त पत्रकारांसाठी सुद्द्धा याचा उपयोग होऊ शकणार आहे.

        मागील महिन्यात ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ ‘एनबीसी न्यूज’ आणि ‘गिझमोडो’ या website ने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला होता असे समजते. Google ने या नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक’ द न्यूयॉर्क टाइम्स’ ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ची मुख्य कंपनी न्यूज कॉपोरेशन ने प्रकाशित केल्याची माहिती या प्रक्रियेशी संबंधित तीन व्यक्तींनी दिल्याचे वृत्त ‘द न्युयॉर्क टाईम्स’ ने दिले आहे असे समजते.Maximum of modern technology! Will this be useful to people in the AI writing field?

       या उत्पादनाबाबत असे ही समजते की, हे तंत्रज्ञान स्वतः माहिती घेऊ शकेल व चालू घडामोडींचे तपशील देऊ शकेल.त्याचबरोबर बातम्याही तयार करू शकेल .

हे ही वाचा

आपले आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करा | आधारकार्ड फ्री अपडेट कसे कराल ? शेवटची तारीख जाहीर ! my Uidai my

        वरील माहिती दिलेल्या तिघांपैकी एका व्यक्तीच्या माहितीनुसार genesis हे पत्रकारांसाठी वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करू शकते. त्यामुळे त्यांना त्यांचे महत्वाचे काम करण्यास मोकळा वेळ मिळू शकेल.वृत्त विभागाची व website, office यांसारख्या क्षेत्रांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढू शकते असे Google ला वाटते. बातम्या तयार करताना येणाऱ्या अडचणी साठी एक उपाय म्हणून जबाबदार तंत्रज्ञान म्हणून Google त्याच्याकडे पाहत असल्याचे समजते.

          प्रात्यक्षिक पाहिलेल्या काही अधिकाऱ्यांच्या पसंतीस Google चे हे तंत्रज्ञान उतरले नाही, हे अस्वस्थ करणारे तंत्रज्ञान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली असून बातम्या लिहिण्यासाठी आणि त्या कलेच्या संबंधित सादर करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते यात लक्षात घेतलेले नाहीत असे दोन जणांनी सांगितले.

        Google च्या बाजूने जेनिफर यांनी ‘जेनेसिस’ ची बाजू घेऊन बोलले.’द व्हर्ज’ शी बोलताना त्या म्हणाल्या की, पत्रकारांना त्यांच्या, रोजच्या कामात ‘AI’ वर आधारित मदत व्हावी यासाठी ज्या भागीदार प्रकाशकांसमोर विशेष करून लहान प्रकाशकांसमोर मांडलेले हे तंत्रज्ञान अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.

हे ही वाचा

नाशिक जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरु |जाहिरात निघाली | लिंक |Onlineअर्ज सादर करण्याचे वेळापत्रक संपुर्ण माहिती.

       बातम्या सांगणे, बातम्या लिहिणे आणि माहिती तयार करणे शक्य आहे की नाही हे पडताळणे अजून प्राथमिक अवस्थेतील आहे असे त्यांचे मत आहे .पत्रकारांच्या भूमिकेला हे तंत्रज्ञान पर्याय ठरवावे असा हेतू नाही आणि तो कधी होणारही नाही असे त्यांना वाटते,पण headline आणि इतर लेखन शैलीसाठी हे तंत्रज्ञान पर्याय देऊ शकते.

          आमचे Google शी उत्तम संबंध आहेत आणि सुंदर पिचाई यांच्या पत्रकारितेच्या दीर्घकालीन बांधिलकीचे आम्ही कौतुक करतो,असे ‘न्यूज कॉर्प’ च्या प्रवक्त्याने सांगितले.google च्या या तंत्रज्ञानाबद्दल लोकांचे मत चांगले नसले तरी पत्रकारितेच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानाबद्दल खूप कुतूहल आहे. अनेक वर्षांपासून स्वतंत्र लेखन करणारे पत्रकार ‘असोसिएट प्रेस’ सारख्या काही वृत्त संस्थांमध्ये उत्सुकता आहे.

         Google च्या या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा आणि तोटा दोन्ही पण आहे. जर या तंत्रज्ञानाकडून सत्य माहिती खात्रीलायकपणे मिळू शकत असेल तर पत्रकार त्याचा वापर करू शकतात. पण बारकावे आणि सांस्कृतिक सामंजस्याची गरज असलेल्या विषयात पत्रकार आणि वृत्तसंस्थांनी याचा गैरवापर केल्यास केवळ या तंत्रज्ञानातच नाही तर त्याचा वापर करणाऱ्या वृत्तसंस्थावरचा ही विश्वास गमावला जाऊ शकतो.

हे ही वाचा

स्वतःच्या घरावर बसवा मोफत सोलर पॅनल|लाईफ टाईम वीज मोफत मिळवा.Govt solar rooftop Yojana.

Leave a Comment