सोपं झाला आता ! व्हाट्सअप वर बुक करता येऊ शकते गॅस सिलेंडर ! पण कसे करणार ?

आपल्या देशात अलीकडच्या दशकात मोबाईल क्रांती झाली आहे. त्यानंतर टू जी, थ्रीजी,फोरजी करता करता आता 5G तंत्रज्ञान आले आहे. त्यामुळे सर्वच गोष्टीचा वेग वाढून त्या सोप्या झाल्या आहेत. एक प्रकारे डिजिटल युगामुळे दैनंदिन व्यवहार ही सोपे झाले आहेत.आता पेट्रोलियम कंपन्या मार्फत ही एक अत्यंत सोयीस्कर व सोपी सुविधा देण्यात आली आहे. व्हाट्सअप पेमेंट करता येते हे आपण ऐकलेले आहे पण आता व्हाट्सअप वर गॅस बुक करता येणार आहे.

व्हाट्सअप च्या माध्यमातून गॅस बुक करताना कोणतीही समस्या येणार नसून,आत्तापर्यंत लोक फोन कॉल च्या माध्यमातून, आयव्हीआर च्या माध्यमातून गॅस बुक करत होते पण आता व्हाट्सअप च्या माध्यमातून एलपीजी गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे. पण हे कसे करता येणार आहे याची माहिती आपणास सर्वांना असणे गरजेचे आहे.
सध्या तरी आपण व्हाट्सअप वर इंडेन, एचपी आणि भारत गॅस या कंपन्यांचे गॅस सिलेंडर बुक करू शकतो इतर कोणत्या कंपन्यांचे जर आपण ग्राहक असाल तर आपण आपणास हे शक्य नाही.

सर्वप्रथम आपण इंडेन कंपनीच्या गॅस सिलेंडरची बुकिंग कशी करावी हे पाहूया.

जर आपण या कंपनीचे उपभोक्ता असाल तर अशावेळी आपणास 75 88 88 88 24 हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये जतन करावा लागेल त्यानंतर बुक किंवा रिफील लिहून एसएमएस सेंड करायचा आहे आणि सूचनेनुसार कृती करावी लागेल.यावेळी एसएमएस मध्ये बुकिंग ची तारीख ही लिहावी लागणार आहे त्याचप्रमाणे ऑर्डर क्रमांक द्वारे तुमच्या गॅस बुकिंग ची माहिती तपासून शकणार आहात.

भारत गॅस सिलेंडर कसे बुक करावे ?

जर तुम्ही भारत गॅस उपभोक्ता असाल तर आपणास 18 00 22 43 44 या क्रमांकावर पहिल्या कंपनीला आपण जसा एसएमएस केलेला होता तसाच यामध्ये सुद्धा करायचा आहे. गॅस बुक करण्यासाठी तुम्हाला हा नंबर सेव्ह करावा लागणार.

एचपी चे गॅस सिलेंडर बुक कसे करावे ?

जर आपण एचपीचे उपभोक्त असाल तर अशावेळी आपणास 92 22201122 हा नंबर जतन करावा लागणार असून त्यावरून एसएमएस पाठवून गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे. अशाप्रकारे गॅस बुकिंग आता व्हाट्सअप वर ही सोप्या पद्धतीने बुक करता येऊ शकणार आहे.

Leave a Comment