कृषी व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या | Transfers of Officers in Agriculture and Animal Husbandry Dairy Development Department.

कृषी व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग विभागात सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (गट अ) च्या बदल्या जाहीर झाल्या आहेत.एकाच जागी,अनेक अधिकारी अनेक वर्षापासून कार्यरत असल्याने तेथील लोकांशी त्यांचे हित सबंध तयार होतात,त्यामुळे भ्रष्टाचारा सारख्या घटना घडू शकतात त्याचबरोबर बदली हा कारवाई चा भाग असल्याने अधिकारी बदली होऊ नये म्हणुन चांगले काम करत राहत्तात, त्यामुळे प्रशासन व्यवस्थित चालते. बदली हा एक प्रशासनाचा भाग असून अशा बदल्या काही कालावधीत होत असतात्त.  

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियमन,2005 मधील 4(1),4(2) व 4(3) मधील तरतुदीनुसार सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेने पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (गट- अ) या संवर्गातील खालील प्रमाणे नमूद कार्यरत अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या 2023 करण्यात येत असून विवरणपत्रातील त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक तीन मध्ये दर्शवलेल्या नमूद ठिकाणी त्यांची प्रशासकीय कारणास्तव बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे.

याची संपूर्ण लिस्ट खाली देण्यात आलेली आहे.

उपरोक्त तक्त्यातील बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी बदली आदेश प्राप्त होतास पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ हजर व्हावे व संबंधित कार्यालय प्रमुखांनी त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश या पत्रकाद्वारे देण्यात येत आहे. बदलीने रिक्त झालेल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार नजीकच्या अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून याबाबत स्थानिक व्यवस्था करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या पदावर हजर झाल्यानंतर तात्काळ कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र सह त्यांचा रुजू अहवाल आयुक्त, पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत विहित मार्गाने शासनास न चुकता विना विलंब सादर करायला सांगण्यात आलेले आहे.

या बाबतचा शासकीय आदेश येथे Download करा. 

आयुक्त, पशुसंवर्धन पुणे यांना कळविण्यात येते की विहित कालावधीत संबंधित अधिकारी रुजू न झाल्यास अथवा त्यांना कार्यालय प्रमुखांनी कार्यमुक्त / रुजू करण्याची कारवाई तात्काळ न केल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी व तसा अहवाल शासनास तात्काळ सादर करावा याबाबत कार्यवाहीचा अहवाल मेल वरती पाठवण्यास सांगितण्यात आलेला आहे.

Leave a Comment