व्हर्च्युअल सायकलिंग : विक्रमवीर गणेश लोहारांनी केली 2700 किलोमीटर व्हर्च्युअल सायकलिंग या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
नासिक -आयोध्या- नाशिक 28 दिवसात 2700 किलोमीटर सायकलिंग
गणेश पांडुरंग लोहार हे महानगरपालिकेत शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. ते दरवर्षी आपली दोन्ही सुपुत्र वेदांत व अथर्व यांना सोबत घेऊन लांब पल्ल्याची सायकलींग मोहीम करीत असतात. लोहार पितापुत्रांच्या या मोहिमेची टॅगलाईन कृण्वंतो विश्वम् आर्यम् व उद्देश- भारतीय संस्कृती व योग यांचा प्रचार व प्रसार करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याची जाणीव जागृती करणे हा असतो.
लोहार पिता पुत्रांच्या नावावर आज पर्यंत सायकलिंग चे पाच रेकॉर्ड आहेत. 2020 मध्ये त्यांनी नाशिक-कन्याकुमारी-नाशिक 3500 किलोमीटर, 2021 मध्ये नासिक-अयोध्या-नाशिक 2814 किलोमीटर, 2022 मध्ये नासिक-सप्तमोक्षपुरी-नाशिक सात हजार किलोमीटर सायकलिंग केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सर्व मोहिमा बॅकअप व्हॅन शिवाय केल्या आहेत .
हे ही वाचा: WhatsApp वर अशी सेटिंग सुरू असेल तर फोन हॅक होऊ शकतो | संरक्षण असे करा.
2024 मध्ये काहीतरी मोठे करण्याची लोहार पिता पुत्रांची इच्छा होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना यावर्षी सायकलिंग मोहीम करता आली नाही. लांब पल्यांची सायकलिंग मोहीम होणार नाही, ही खंत त्यांच्या मनात होतीच. दैवयोगाने नाशिक सायकलीस फाउंडेशन ने अलविदा 2023 हे चॅलेंज दिले व त्या चॅलेंजमध्येच माननीय श्री प्रवीणजी खाबिया यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ ही राईड देण्यात आली.

ही सुवर्णसंधी साधून आपण या राईडलाच मोहिमेत रूपांतर करू शकतो का? याचा विचार सुरू झाला. सर्व काम धंदे सांभाळून उरलेल्या वेळेत आपण जास्तीत जास्त सायकलिंग करू शकतो का? यावर चिंतन सुरू झाले. “अवघड तेच करायचे” असे आम्हा तिघांचे एकमत झाले. आणि सर्व भारतात उत्साह वातावरण निर्माण करणारे, 496 वर्षानंतर पुन्हा आपल्या अयोध्येत स्वगृही परतणारे, श्रीराम यांच्या अयोध्येची “श्रीरामोत्सव ” व्हर्च्युअल 2700 किलोमीटरची सायकलिंग 31 दिवसात करण्याचे ठरले.
हे ही वाचा: नाशिक जिल्हास्तरीय बालमहोत्सव : 2024 खुली रंग भरण स्पर्धा सहभागी व्हा
31 दिवसात 2700 किलोमीटर सायकलिंग करणे अवघडच होते. कारण यापूर्वी 2021 मध्ये नासिक अयोध्या नाशिक ही मोहीम 21 दिवसात त्यांनी पूर्ण केली होती.परंतु भगवंताचे आशीर्वाद, परमपूज्य दादाजींची कृपा व तुम्हा सर्वांच्या प्रेरणेमुळे सत्तावीसशे किलोमीटर सायकलिंग 28 दिवसात पूर्ण केली.
दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी “श्रीरामोत्सव व्हर्च्युअल सायकलिंग मोहिमेची” सांगता सायंकाळी सात वाजता मा. श्री प्रवीणजी खाबीया, मा.श्री राजेंद्रजी वानखेडे मा. श्री किशोरजी माने मा.श्री. राजेंद्रजी दाभाडे, मा.श्री. सुरेशजी खांडबहाले यांच्या उपस्थितीत पार पडली. लोहार परिवाराच्या व लोहार परिवारावर प्रेम करणाऱ्या शुभचिंतकांनी औक्षण केले नंतर काळाराम मंदिराच्या आवारात रामरक्षास्तोत्राचे सामूहिक पारायण करण्यात आले. प्रवीण जी खाबिया यांनी मोहीम पूर्ण केल्याबद्दल मोत्यांचा हार भेट म्हणून दिला.अनेक मान्यवरांनी येथोचित सत्कार करून या मोहिमेची सांगता झाली. या सांगता कार्यक्रमास अनेक नातेवाईक मंडळी मित्र परिवार उपस्थित होते.
लोहार पिता-पुत्रांचा हा विक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे.अध्यात्म आणि पर्यावरण पूरक जागृती हा उद्देश असलेला हा उपक्रम समाजासाठी नक्कीच फायदेशीर आहे. या पिता- पुत्रांच्या अशाच धाडसाला सामाज्याकडून बळ मिळत राहो हीच सदिच्छा.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680