सन 2022-2023 मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडून राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी सहभाग घेतलेला होता. विविध उपक्रम सादर करण्यात आले होते. सौ.अस्मिता धर्मराज ठिकणे,मुख्याध्यापिका, सेवा भारती संचलित,माधव शिशु मंदिर इचलकरंजी यांनी एक उपक्रम सादर केला होता.
उपक्रमाचे नाव होते “क्षमता विकास वर्ग”. Misunderstanding pre-primary education as part of primary education Introduction Article under the initiative submitted to SCERT.
हे ही वाचा
धृवनगरच्या शाळेतील मा.दिनकर आण्णा पाटील यांचे संपुर्ण भाषण ; शाळेस बांधुन देण्यात येणार वर्गखोली.
स्पर्धा गट होता : पूर्व प्राथमिक गट.
त्यांनी उपक्रमापूर्वी प्रस्तावना म्हणून आपले मनोगत व्यक्त केले आहे. ते काय आहे आज आपण वाचणार आहोत. अतिशय सुंदर मनोगत मांडले आहे,याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.
आदरणीय मान्यवर,सस्नेह वंदे। माझा नवोपक्रम आपणासमोर सादर करण्यापूर्वी माझे मनोगत, माझे दोन शब्द आपणासमोर मांडू इच्छिते.
आत्ताचे ” बाल शिक्षण हे मुलांना भरपूर संधी उपलब्ध करुन देणारे तसेच जिज्ञासा, कुतूहल, निरीक्षण या उपजत प्रवृत्तींना वाव देणारे ” असे असावे. या मेंदू आधारीत नवविचारांना प्राधान्य देवून त्याप्रमाणे क्षमता विकास वर्गाची रचना करण्यात आली आहे. मुलांच्या क्षमता आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिक सामाजिक, भाषिक, आत्मिक विकास लक्षात घेऊन विषयांची मांडणी करण्यात आली आहे. जसे प्रत्यक्ष स्वयंपाकाला फारसा वेळ लागत नाही परंतू त्याच्या पूर्वतयारीचे नियोजन मात्र नीट करावे लागते. अनौपचारिक शिक्षणाची पूर्व तयारी उत्तम झाली की प्रत्यक्ष औपचारिक शिक्षण व्हायला वेळ लागत नाही. पण काही ठिकाणी असे आढळते की. शिक्षक, पालक, संस्थाचालक यांची मूळ भूमिकाच चूकीची असते. प्राथमिक शिक्षणापूर्वीचे शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षणाचाच एक भाग समजून ते लेखन वाचनाची सक्ती लहान मुलावर वर करतात. वास्तविक ही चूकीची गोष्ट आहे. लेखनाच्या दृष्टीने पाहता मुलांच्या मनगटातील सहा हाडे ही वयाच्या सातव्या वर्षापर्यंत सबल होतात. त्यानंतर त्यांना दोन ओळीत लिहण्याची क्षमता प्राप्त होते. याचाच अर्थ यापूर्वी त्यांना लेखन शिकवणे हे अनैसर्गिक आहे. औपचारिक शिक्षणात जे शब्द, जी वाक्ये ही मुले लिहणार त्यांचा संबोध मेंदूला होणे ही अत्यावश्यक बाब आहे. उदा- आंबा, लिंबू, बाग, विहीर, फुले, देऊळ, झाड, वेल, हे शब्द मुलांना नुसतेच बोध न होता अनुलेखनाने लिहले तर त्यांचे शिक्षण झाले असे आपल्याला म्हणता येणार नाही. आंबा म्हणताक्षणी आंब्याचा रंग, चव, आकार त्याचे वैशिष्ट या सगळ्याची प्रतिमा मुलांच्या डोळ्यासमोर उभी राहिल. तेव्हाच त्याचे खरे शिक्षण होईल. पाठ्यपुस्तकातील शब्द वाचनात येण्यापूर्वी पूर्व प्राथमिक मध्ये चित्रांद्वारे, प्रत्यक्ष पाहून, शक्य असल्यास ती वस्तू हाताळून वेगवेगळ्या प्रकारे बालकाने त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असला की मग औपचारिक शिक्षण प्रत्यक्ष शिकणे ही प्रक्रिया अत्यंत सोपी होते.
हे ही वाचा
पळसखेड्यात रानातल्या कवितांची निसर्गसंपन्न लेणी कोरणारे आठवणीतील अजिंठ्याजवळचे कवी ना.धो.महानोर.
मुलांमध्ये असलेली जिज्ञासा, कुतूहल, निरीक्षण, नवनिर्माण प्रवृत्ती यांना 4 ते 6 या वयात म्हणजेच पूर्वप्राथमिक मध्ये भरपुर खतपाणी मिळायला हवे विविध स्वरुपाचे अनेक खेळ, अनेक कृती, परिसराचे प्रत्यक्ष अनुभवातुन ज्ञान, बडबड गीते, संवाद, मातीकाम, चित्रकाम, हस्तव्यवसाय, प्रत्यक्ष जीवनातील अनुभव कृती यांच्या सुयोग्य संधी प्राप्त झाल्या आणि कुटुंबाचे प्रेम भरपूर प्रमाणात मिळाले तर मुलांची वाढ आणि विकास हा निकोप होईलच यात शंका नाही. मुलांच्या शिक्षणात खेळ व खेळात शिक्षण हवे ते आनंददायी असावे, विकासाला पोषक असावे, हाच विचार या उपक्रमात केला आहे. उपजतच असलेल्या प्रेरणांना म्हणजेच धावणे, उडया मारणे, नाचणे, खेळणे, बागडणे, लोंबकळणे यांना शास्त्रीय स्वरूप देऊन पूर्वप्राथमिकमध्ये या प्रेरणांची तृप्ती विधायक
पदधतीने केली आहे. थोडक्यात पूर्व प्राथमिक शिक्षण हे प्राथमिक शिक्षणाचाच एक भाग नसून शिक्षण प्रक्रियेतील एक स्वतंत्र टप्पा आहे याची सर्वानीच नोंद घेतली पाहिजे यासाठी क्षमता विकास वर्ग हा नवोपक्रम मी हाती घेतला आहे हा उपक्रम आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा करते.
या ठिकाणी आपण उपक्रम पाहू शकता : https://www.maa.ac.in/index.php?tcf=innovation2022_23
हे ही वाचा
खरं पाहता, अशा पद्धतीने शिक्षणाकडे जर सूक्ष्मपणे पाहिले तरच विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकतो. आपल्या कडून अतिअपेक्षा करणे किती योग्य आहे हे समजणे महत्त्वाचे आहे.
Misunderstanding pre-primary education as part of primary education Introduction Article under the initiative submitted to SCERT.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680