Vitamin D मिळवण्याचे 8 स्त्रोत्त आणि महत्त्वाचे Useful फायदे

Vitamin D मिळवण्याचे स्त्रोत्त आणि महत्त्वाचे फायदे या विषयी सविस्तर माहिती.

आपल्या शरीरासाठी Vitamin D हे फारच उपयुक्त असते. Vitamin D चे मुख्य स्तोत्र हे सूर्यकिरण आहे. सूर्यकिरणामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर Vitamin D हे मिळते. सकाळी सात ते आठ च्या दरम्यान मिळणा-या सूर्यकिरणापासून आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर Vitamin D हे मिळते. 8 Sources and Important Benefits of Getting Vitamin D

Vitamin D

हाडांसाठी Vitamin D हे फारच महत्त्वाचे असते. जर Vitamin D हे मिळाले नाही तर विविध आजारांना आपण बळी पडू शकतो. यावरून आपल्याला कळते की विटामिन डी हे शरीरासाठी किती गरजेचे असते.

हिवाळ्यात शरीरातील पुरेसे Vitamin D हे मिळत नाही आणि त्याच कारणास्तव हिवाळ्यात विविध आजार हे होतात. आपले हात पाय दुखतात आणि या आजारांना प्रतिकार म्हणून Vitamin D हे आपल्या शरीरातील हाडांसाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी फारच गरजेचे असते.

हे ही वाचा: व्हाट्सअँप हॅकरने हँक केले तर काय कराल?

फायदे

  • पेशींच्या वाढीसाठी Vitamin D खूप महत्त्वाचे आहे.
  • निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिबंधक प्रणाली शाबूत राखण्यासाठी
  • कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी
  • हार्मोन फंक्शन आणि मज्जासंस्था नियमन
  • हाडांच्या विकासासाठी आणि बळकटीसाठी
  • वाढीचे योग्य नियमन आणि सेल-टू-सेल संप्रेषण

Vitamin D चे काही स्त्रोत्त पुढीलप्रमाणे:-

  • अंडी
  • बीफ लिव्हर
  • फिश लिव्हर
  • कॅन फिश जसे की हेरिंग आणि सार्डीन
  • ब्रेकफास्ट सिरीयल्स
  • दूध
  • सोया मिल्क
  • ऑरेंज जूस
  • पॅटीस फिश जसे की साल्मन, ट्राउट, ट्युना, आणि माकरेल

हे ही वाचा: (PMJJBY) 2 लाखांचा विमा फक्त 20 रुपयांत सरकारची अनोखी योजना

मशरूम

हिवाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने हाडांना पुरेसे Vitamin D देखील मिळत नाही. अशा वेळेस शरीर ला Vitamin D मिळवावे लागते म्हणूनच हिवाळ्यात असे पदार्थ खायला हवेत, ज्याने आपल्या शरीराला चांगल्या प्रमाणात विटामिन डी हे मिळत असते.

शरीरात विटामिन डी ची गरज पूर्ण करायची असेल तर मशरूम हे खायला हवेत. मशरूम खाल्ल्याने आपल्या शरीराला पुरेसे विटामिन डी मिळतात. शरीराला विटामिन डी 2 आणि विटामिन डी 3 देखील मिळते. यातील विटामिन डी ची गरज ही पूर्ण होते.

मशरूम हे सँडविच मध्ये टाकून सलाड मध्ये टाकून खाऊ शकतो. त्याचबरोबर मशरूमची भाजी करून देखील खाऊ शकतो.

अंडी

शरीरात अंड्यांमुळे देखील विटामिन डी ची गरज पूर्ण होते. अंडी खाल्ल्याने देखील शरीरात पुरेसे विटामिन डी हे मिळते. त्यामुळे शरीरातले हाड ही नेहमी मजबूत राहतात.

अंड्याचे विविध खाद्यपदार्थ बनवून त्यांचे सेवन केल्याने शरीराला विटामिन डी हे मिळते. अंडी खाल्ल्याने शरीराला विटामिन डी हेच मिळत नसून अंड्याचे सेवन केल्याने शरीरात प्रथिनांची गरज पूर्ण होते. त्याचबरोबर शरीराला अमिनो ऍसिड देखील मिळते.

हे ही वाचा: विक्रमवीर गणेश लोहारांनी केली 2700 कि.मी.व्हर्च्युअल सायकलिंग.

चीज

जसे अंडी व मशरूम खाल्ल्याने विटामिन डी हे मिळते त्याचप्रमाणे शरीराला चीज चे सेवन केल्याने देखील विटामिन डी हे मिळते व शरीरातील विटामिन डी ची गरज पूर्ण होते. चीज है विविध खाद्यपदार्थांमध्ये टाकून त्याचे सेवन करू शकतो.

सोया मिल्क

शरीराला सोया मिल्क ने देखील विटामिन डी हे मिळते. इतर खाद्यपदार्थांबरोबरच सोया मिल्क मुळे देखील विटामिन डी हे मिळते. शरीराला दुधामुळे देखील व्हिटामिन डी मिळते.शरीराला सोयामिल्क मधून लोह, विटामिन सी, कॅल्शियम त्याचबरोबर शरीरातली प्रोटीन ची गरज देखील पूर्ण होते. सोया मिल्क हा विटामिन डी चा एक वनस्पती आधारित स्तोत्र आहे.

मासे

शरीरात विटामिन डी ची गरज हे मासे यामुळे देखील पूर्ण होते. मासे हे असे खाद्यपदार्थ आहे, ज्याने विटामिन डी मिळते. माशांमध्ये ट्यूना आणि सल्मन हे असे दोन मासे आहेत. हे मासे शरीराला विटामिन डी पुरवतात. या माशांना सहजपणे आहारात आणू शकतो व शरीराला विटामिन डी बरोबरच ओमेगा- उफॅटी ऍसिडस, प्रथिने आणि काही प्रमाणात पोषक तत्वे देखील मिळत असतात.

हे ही वाचा: WhatsApp वर अशी सेटिंग सुरू असेल तर फोन हॅक होऊ शकतो | संरक्षण असे करा

फोर्टीफाईड

शरीरातल्या विटामिन डी ची गरज पूर्ण करण्यासाठी विटामिन डी फोर्टीफाईड अन्न हे देखील उपयोगी असते. विटामिन डी फोर्टीफाईड अन्नाद्वारे देखील विटामिन डी मिळते.

फोर्टीफाईड खरेदी करता येणारे अनेक खाद्यपदार्थ हे बाजारात मिळतात. बाजारात विटामिन डी फोर्टीफाईड दूध, तृणधान्ये मिळतात व याद्वारे शरीराला पुरेसे विटामिन डी मिळते.

हिवाळ्यात शरीराला पुरेसे विटामिन डी मिळत नाही, पण जर आपण हिवाळ्यात या सहा खाद्यपदार्थांचे सेवन केलेत तर या खाद्यपदार्थांमधून विटामिन डी मिळते.हिवाळ्यात देखील आपल्या शरीराला विटामिन डी ची गरज ही पूर्ण होईल.

Leave a Comment