10 वी आणि 12 वी नंतर पुढे काय ? या समुपदेशन मेळाव्यास उपस्थित रहा ! 

नाशिक मध्ये 8 मे रोजी समुपदेशन मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र शासन, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत होणार असुन या समुउपदेशन मेळाव्याचे उद्घाटन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे.

 हा समुपदेशन मेळावा नाशिक मधील दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर येथे आयोजित करण्यात येणार असुन त्यानुसार मा.जि. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नाशिक यांचे पत्र जा. क्र. जिव्यना/क-3/2023/666,दि.02/05/2023 संदर्भीय पत्र नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागास प्राप्त झाले असुन मा. प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांनी सर्व शाळांना परिपत्रकाद्वारे कळविलेले आहे की, विद्यार्थी व युवक युवतीसाठी छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिर (समुपदेशन मेळावा) सोमवार दिनांक 8 /5/ 2023 रोजी सकाळी ठीक 9 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर, नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे. 

या उपक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री मा. दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, या उपक्रमात इयत्ता दहावी व बारावी पुढे काय ? प्रवेश प्रक्रिया,व्यक्तिमत्व विकास इत्यादी बाबत माहिती दिली जाणार आहे. सदर उपक्रमास आपल्या अधिनस्त शाळेतील जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांना व पालकांना उपस्थित राहुन लाभ घेण्यासाठी परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. सोबत पत्र जोडलेले आहे.

या उपक्रमाचे आयोजन मा. मंत्री कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्यता विभाग यांनी दिनांक 20 /4 /2023 व 22 /4 / 2023 रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार 5 मे 2023 ते 6 जुन 2023 या कालावधीत विद्यार्थी व युवक युवतीसाठी छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबिर (समुपदेशन मेळावा ) या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. 8 मे 2023 रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी,युवक आणि युवतीसाठी ही एक पर्वणीच आहे असे म्हणायला हरकत नाही. या पर्वणीचा लाभ नाशिक जिल्ह्यातील पालकांनी युवक,युवतीनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. बरेचसे पालक आपल्या मुलांबरोबर संभ्रमावस्थेत असतात की दहावी किंवा बारावी झाल्यानंतर आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून देता येतील त्याच्या ते विचार करत असतात. विद्यार्थी,युवक, युवतीना आणि पालकांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि असेच योग्य मार्गदर्शन या समुपदेशन मेळाव्यामध्ये मिळणार असुन त्याचा लाभ सर्वांनी घेणे अपेक्षित आहे.

Leave a Comment