व्हाट्सअँप हॅकरने हँक केले तर काय कराल?

व्हाट्सअँप हॅकरने हँक केले तर ? तुम्हाला काय करावे लागेल या विषयी सविस्तर माहिती.

सध्या सायबर गुन्हेगारी जास्त प्रमाणात वाढलेली दिसून येते. आपल्या मोबाईल मध्ये अनेक विषयांसंदर्भात ओ.टी.पी हे येत असतात किंवा आलेले असतात. हॅकर्स आपल्याकडून हे ओ.टी.पी माहीत करून घेतात व आपला मोबाईल हॅक करतात.

मोबाईल हँक झाल्याने आपल्या बँकेतले सर्व पैसे हे त्या हॅकर्सच्या बँक खात्यात वळवू शकतात . एखाद्या वेळेस आपल्याला फोन येतो की, आपल्याला एक पार्सल मिळणार आहे व त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये आलेला ओ.टी.पी हा त्यांना पाठवावे लागेल तेव्हा आपण तो ओ.टी.पी त्यांना पाठवतो त्याच क्षणी आपल्या बँक अकाउंट मधील पैसे हे गायब होऊन जातात. अशाप्रकारे सायबर गुन्हे हे घडत असतात.

हॅकर आपला मोबाईल हॅक करून जसे आपले बँक अकाउंट मधील पैसे गायब करतात तसेच काही वेळेस हे हॅकर्स आपल्या व्हाट्सअँप देखील हॅक करू शकतात. आपल्या कॉन्टॅक्ट मधील सर्व लोकांना असा मेसेज पाठवतात की, आपल्याला तात्काळ पैशांची गरज आहे. मी तुम्हाला काही दिवसात ते पैसे परत करतो अशा वेळेस ते पैसे त्या हॅकर जवळ जातात व आपला व्हाट्सअँप हा वापरताही येत नाही व उघडताही येत नाही.

हे ही वाचा: विक्रमवीर गणेश लोहारांनी केली 2700 कि.मी.व्हर्च्युअल सायकलिंग.

काही वेळेस हॅकर्स एका व्यक्तीचे मोबाईल हॅक करून अजून त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या व्यक्तींचा मोबाईल देखील हॅक करून शकतात. हॅकर्स हे एका व्यक्तीच्या मोबाईल वरून अजून अनेक लोकांचे मोबाईल हे हॅक करू शकतो.

जर अशा प्रकारे एखाद्या वेळेस तुमचा व्हाट्सअँप हॅक झाला असेल किंवा मोबाईल हॅक झाला असेल तर, लगेच 1930 हा नंबर डायल करून सायबर सेल मध्ये कंप्लेंट करावी. अशा वेळेस सायबर सेलही त्याविषयी चौकशी करतात व त्या हॅकर्सला पकडण्याचा प्रयत्न करतात. व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाते.

अशाप्रकारे सायबर सेल हे त्यांचे कार्य अत्यंत सचोटीने पार पाडते. या सायबर सेल मध्ये चांगल्या पद्धतीचे 100 प्रशिक्षित अधिकारी हे कार्यरत असतात व पुढे जाऊन अधिकाऱ्यांची ही संख्या ही वाढू शकते. हे सर्व पुढच्या स्थितीवर अवलंबून राहणार आहे.

हे ही वाचा:WhatsApp वर अशी सेटिंग सुरू असेल तर फोन हॅक होऊ शकतो | संरक्षण असे करा.

तुमचा मोबाईल हा कधी हॅक व्हायला नको म्हणून नेहमी दोन वेगवेगळे नंबर ठेवावेत. एक नंबर असा जो सर्वांना दिलेला असेल व एक नंबर असा जो आपल्या बँक अकाउंट जोडलेला असेल. अशाप्रकारे तुमचा मोबाईल हॅक व्हायला नको म्हणून तुम्ही ही सुरक्षा बाळगू शकता.

सोशल मीडियावर अनेक वेळा वाचतो की, हॅकर्स कशाप्रकारे मोबाईल हॅक करून बँक अकाउंट चे सर्व पैसे गायब करू शकतात किंवा कशाप्रकारे व्हाट्सअँप हॅक करतात. त्यामुळे आपण नेहमी याविषयी सावध राहतो की अशा गोष्टी आपल्यासोबत सोबत घडायला नको पण, तरीही हॅकर्स मोबाईल हॅक करू शकतात.यासाठी विशेष काळजी आपण घेतली पाहिजे.

अशा पद्धतीने सायबर गुन्हे हे होऊ नये म्हणून भारत सरकारने सायबर सेलची देखील स्थापना केली आहे. यांच्या मदतीने तुमच्यासोबत कोणताही सायबर गुन्हा झाल्यास त्याविरुद्ध कारवाई करून त्या गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकते . आज सायबर सेल च्या मदतीने सरकारने लोकांचे एक कोटी पेक्षा जास्त पैसे हे वाचवलेले आहेत. सायबर सेल मुळे सायबर गुन्हेगारांना चांगला धडा मिळतो.

हे ही वाचा: शेत जमीन खरेदी करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी

सोशल मीडियावर सायबर सेलचे अकाउंट आहे, ज्यावर सायबर गुन्हेगारी कशी होते त्याबद्दल माहिती दिलेली असते. त्याचबरोबर आपण गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे हे देखील सांगितलेले आहे. सायबर सेलच्या या अकाउंट वर मोबाईल हॅक होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याविषयी देखील माहिती मिळते.

अशाप्रकारे सायबर गुन्हे कसे रोखायचे याविषयीची माहिती आपल्याला सायबर सेल कडून मिळते.

Leave a Comment