पुरुषांचे वजन वयानुसार किती असावे ? महत्त्वाची माहिती

पुरुषांचे वजन वयानुसार किती असावे ? महत्त्वाची माहिती सविस्तर जाणून घेऊ

सध्या महिलांसोबत पुरुषांना देखील लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागते उदा , डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि अस्थमाचे प्रकार इत्यादी आजार होत असतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे वजन वाढल्याने काही होत नाही तर असा विचार करू नये तुमच्या वजनात नेहमी संतुलन असायला हवे.

हे ही वाचा: निर्मल ग्राम निर्माण केंद्रामध्ये बिलिफ कडून लहान मुलांसाठी समर कॅम्प

बीएमआय म्हणजे काय?

बीएम आय म्हणजे तुमच्या उंची आणि वजनाच्या आधारावर तुमच्या शरीरातील फॅटचे प्रमाण जाणून घेण्याची एक पद्धत होय. सर्वात उत्तम बीएमआय म्हणजे 18.5 ते 25 दरम्यानचा. तुमचा बीएमआय जर 25 ते 30 दरम्यान चा असेल तर ते ओवर वेट होईल. जर बी एम आय चे प्रमाण 18.5 च्या खाली असेल तर ते अंडरवेट मानले जाईल. जर तुमच्या शरीराचे बीएमआय चे प्रमाण वर पातळीवर जात असेल तर यामुळे तुम्ही लठ्ठ बनत आहे हे कळते.

हे ही वाचा: सुवर्णसंधी : नवोदय विद्यालय समितीकडून 1377 पदांची भरती

बॉडी मास इंडेक्स (बी एम आय)

जर तुम्हाला तुमचे बीएमआय मोजायचे असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे ते म्हणजे BMI=weight ÷height M2 म्हणजे तुमची जेवढी उंची आहे, त्याचे मीटर मधील वर्ग याचा भागाकार तुमच्या वजनाशी करावा ज्याने तुम्हाला तुमचा बीएमआय कळेल.

हे ही वाचा: आईचे नाव बंधनकारक : कोणकोणत्या कागदपत्रांवर ?

वयानुसार किती असाव वजन

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आयडियल नुसार 19 ते 39 वयातील पुरुषांचे वजन हे 65 किलोच्या आसपास असायला हवे. 2010 सालापर्यंत हे वजन 60 किलो एवढे होते पण 2020 पासून हे वजन 65 किलो एवढे झाले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आयडियलच्या दुसऱ्या रिपोर्टनुसार 19 ते 39 वर्षातील पुरुषांचे वजन 83.4 किलो, 30 ते 39 वर्षातील पुरुषांचे वजन 90.3 किलो, 40 ते 49 वर्षातील पुरुषांचे वजन 90.9 किलो आणि 50 ते 60 वर्षातील पुरुषांचे वजन 91.3 किलो एवढी असायला हवे असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment