दहावी नंतर कोणती 8 कौशल्ये विकसित होणे आवश्यक.

दहावी नंतर कोणती कौशल्ये विकसित करायला पाहिजे या विषयी सविस्तर माहिती.

प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यभर एक विद्यार्थी असतो. त्याच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात तो काही ना काही शिकत असतो. शिकल्याशिवाय आपल्याला जगातील नवनवीन गोष्टीबाबत माहिती कशी मिळणार? आयुष्यात आपल्या व्यक्तिगत विकास होणे गरजेचे असते.कोणत्याही स्पर्धेत भक्कमपणे टिकून राहायचे असेल तर, आपल्याकडे कौशल्य असणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्आपल्यातील कौशल्य विकास होणे गरजेचे आहे.

हे ही वाचा: तुमच्या Aadhar Card चा वापर दुसरे कोणी करत नसेल ना ? मोबाईलमध्ये असे तपासा

आपल्या आयुष्यात शिक्षण जसे गरजेचे आहे त्याचप्रमाणे कौशल्य विकास होणे देखील गरजेचे आहे. आपल्या कौशल्यामध्ये वाढ करायची असेल तर त्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. शाळेतील मुले असो व निवृत्तीनंतरचे व्यक्ती या सर्वांना त्यांच्या कौशल्याचा विकास करता येऊ शकतो. दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांजवळ खूप रिकामा वेळ असतो. या रिकाम्या वेळेत बरेच विद्यार्थी मोबाईल बघण्यात वेळ घालवतात तर, काही विद्यार्थी या वेळत नवनवीन कोर्स करतात. त्यांच्या कौशल्य वाढीसाठी क्लासेस लावतात. त्याचप्रमाणे आपण देखील दिवसातले दोन तास जरी आपल्या कौशल्य विकासासाठी दिले तर भविष्यात याचा नक्की फायदा होवू शकतो.

संवाद कौशल्य विकसित करणे

खूप वेळेस बाहेरील व्यक्तीशी बोलताना आपण लाजत असतो. अशा वेळेस आपल्या बोलण्यावरून आपले व्यक्तिमत्व ठरत असते.संवाद कौशल्य वाढीसाठी स्पिकिंग स्किल क्लासेस, पब्लिक स्पिकिंग स्किल क्लासेस, इत्यादी उपलब्ध आहेत. या क्लासेसमध्ये मार्गदर्शन घेतल्यावर संवाद साधतांना भीती वाटत नाही व बोलण्यासाठी धाडस निर्माण होते. ऑनलाइन क्लासेस करून देखील संवाद कौशल्य वाढवण्यासाठी टिप्स मिळू शकतात, ऑनलाइन क्लासेस हे सहज मिळून जातात. याद्वारे देखील आपण आपले संवाद कौशल्य वाढवू शकतो.

हे ही वाचा: Vitamin D मिळवण्याचे 8 स्त्रोत्त आणि महत्त्वाचे Useful फायदे

इंग्रजी बरोबरच परकीय भाषेचे शिक्षण

अनेक मुले इंग्रजी माध्यमातून शिकत असतात. त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेविषयी चांगले ज्ञान अवगत असते. दहावीनंतर शिक्षणासाठी इंग्रजी भाषा ही फारच महत्त्वाची आहे. परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर, त्यावेळेस इंग्रजी बोलता येणे गरजेचे आहे. यासाठी दहावीतील इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम हा पुरेसा नसतो म्हणूनच इंग्रजीचे ज्ञान वाढवण्यासाठी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस हे उपलब्ध असतात. या क्लासेस मुळे इंग्रजी ज्ञान हे वाढते.

नेतृत्व कौशल्य

जर आपले मत पटवून द्यायचे असेल तर, त्यासाठी नेतृत्व कौशल्य असणे गरजेचे आहे. नेतृत्व कौशल्याद्वारे चांगल्या पद्धतीने भाषण करून आपले मत पटवून देऊ शकतो. यासाठी देखील ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात क्लासेस हे उपलब्ध असतात. हे क्लासेस करून देखील आपण आपले नेतृत्व कौशल्य वाढवू शकतो.

हे ही वाचा: 60 सेकंदात समजेल तुमच्या नावावर किती सिमकार्ड

जीवन कौशल्य

चारित्र्याची उत्तम प्रकारे जडणघडण होण्यासाठी जीवन कौशल्ये विकसित होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमधील वर्ग चर्चा, विचार मंथन, इत्यादी द्वारे त्यांच्यातील जीवन कौशल्ये वाढते. त्याचबरोबर जीवन कौशल्य वाढवण्यासाठी काही संमेलन देखील होतात. त्यांच्या मदतीने विद्यार्थी त्यांच्यातील जीवन कौशल्ये वाढवू शकतो.

वाचन कौशल्य

विद्यार्थ्यांसाठी वाचन कौशल्य फार महत्त्वाचे आहे. आता विद्यार्थी पुस्तकांचे अवांतर वाचन करत नाही. त्यामुळे त्यांचे वाचन कमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना आता सर्वच गोष्टी इंटरनेटवर सहज उपलब्ध होत आहेत त्यामुळे त्यांची वाचनाची सवय ही कमी झालेली आहे. तरीही उपाय म्हणून वाचन कौशल्य वाढवण्यासाठी देखील क्लासेस असतात. त्याचबरोबर पुस्तकांच्या अवांतर वाचनामुळे देखील आपले वाचन कौशल्य वाढतील.

हे ही वाचा: व्हाट्सअँप हॅकरने हँक केले तर काय कराल?

लेखन कौशल्य

सध्या विद्यार्थ्याचे लिखाण हे फारच कमी झाले आहे. लिखानाचा सराव होत नसल्याने लेखनात खराब अक्षर येणे, लिहिण्यासाठी वेळ जास्त लागणे अशा समस्या या येत असतात. यावरही उपाय म्हणून हँड रायटिंग क्लासेस हे उपलब्ध आहेत व क्लासेस द्वारे आपण लेखन कौशल्य हे चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो.

हे ही वाचा: (PMJJBY) 2 लाखांचा विमा फक्त 20 रुपयांत सरकारची अनोखी योजना !

क्लासेस द्वारेच आपण हे कौशल्य विकसित करू शकतो असे नाही परंतु लेखन कौशल्य हे सराव करू देखील आपण सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो. वाचन कौशल्य हे पुस्तकांचे अवांतर वाचन करून वाढवू शकतो. हे सर्व कौशल्ये पुस्तकांमध्ये सहज उपलब्ध आहेत परंतु प्रत्यक्षात अनुभवातूनच आपल्यामध्ये विकसित होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्ताकांचे वाचन करणे गरजेचे आहे.

Leave a Comment