स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रिलीज झालेला चित्रपट Gadar 2, या सिनेमाने मोठ्या प्रमाणात कमाई केलेली आहे. हा सिनेमा सनी देओल व अमिषा पटेल यांचा असून हा एक प्रेम कथेवर आधारित आहे.त्यातच रजनीकांत यांचा Jailer हा चित्रपट Gadar 2 या चित्रपटाबरोबर जवळजवळ रिलीज झालेला होता. हा चित्रपट Gadar 2 च्या बरोबरीला येऊ शकतो की नाही हे आता सांगता येते कि नाही पुढे पाहू या.परंतु रंजनीकांत वर सनी देओल भारी पडत आहे वर वर तरी असे दिसून येते.Who is heavier? Superstar Ranjanikant’s Jailer? Know Sunny Deol’s Gadar 2.
हे ही वाचा
सावधान ! मुंबईमध्ये बऱ्याच महिला सोबत असे घडत आहे ;असे होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल ? Scam | fraud
Jailer, घूमर, Gadar 2 व OMG -2 या चित्रपटाने परदेशातून व भारतातून किती कमाई केली आहे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
Box office collection Gadar 2 and Jailer
Bollywood साठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सिनेमा box office वर एकत्र तीन सिनेमी रिलीज झाले असून कोणता चित्रपट जास्त कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेलेले आहे. सुपरस्टार रंजनीकांत याचा jailer, बॉलीवूड मध्ये 300 कोटीच्या घरामध्ये पोहोचलेला प्रसिद्ध असलेला अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट Gadar 2, त्याचबरोबर अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा चित्रपट ओ एम जी 2 ( OMG-2 ) या चित्रपटांची अलीकडे प्रेक्षकांमध्ये व बॉक्स ऑफिसवर खूपच चर्चा असलेली दिसून येते.
ही हे वाचा
एकत्र तीन चित्रपट रिलीज झाले होते परंतु त्यात अजून एक भर पडली असून याच दरम्यान अभिषेक बच्चनचा “घुमर” हा चित्रपट ही रिलीज झाला आहे. Jailer या चित्रपटाची अर्थात रंजनीकांतची सुद्धा जगभरात व भारतात चर्चा असलेली आढळून येते. Gadar 2 च्या रूपाने बॉलीवूडला एक यशस्वी चित्रपट म्हणून सन्मान मिळू लागलेला आहे.
गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडला प्रचंड मरगळ आलेली होती ती कुठेतरी झटकताना दिसत आहे. Who is heavier? Superstar Ranjanikant’s Jailer? Know Sunny Deol’s Gadar 2.
हे ही वाचा
आता आपली आवडती स्प्लेंडर इलेक्ट्रिक अवतारात ; इतकी असणार किंमत.
सनी देओल आणि अमिषा पटेल, सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांनी भारत व परदेशामध्ये प्रचंड कमाई केलेली दिसून येते. Jailer हा चित्रपट भारतामध्ये जेव्हा रिलीज होऊन नऊ दिवस झाले होते त्यावेळी या चित्रपटाची कमाई 244.85 कोटींची होती. आता परदेशातून या चित्रपटाने 426.7 कोटींचा गल्ला जमवलेला आहे. याचा अर्थ चित्रपटाची कमाई ही प्रचंड आहे.
असे असले तरी, रजनीकांत पेक्षा सनी देओल बॉक्स ऑफिसवर वरचढ असल्याचे दिसून येते.
प्रसिद्ध अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट गदर-2 हा चित्रपट जसे जसे दिवस पुढे जात आहेत तसे तसे या चित्रपटाची कमाई ही शिखरावर पोहोचत असलेली दिसून येते. Gadar 2 या चित्रपटाला विकेंडचा चांगल्या प्रकारे फायदा झाला आहे. त्याचबरोबर जमेची बाजू ही आहे की,हा चित्रपट स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता, त्यामुळे या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पसंती दर्शवलेली आहे.
हे ही वाचा
सनी देओलचा गदर-2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणणार ! चित्रपटाचा रिव्ह्यू वाचा.
चित्रपट प्रेक्षकांना आवडत असल्यामुळे आता सध्या या चित्रपटाला भारतामधून 304.13 कोटींची कमाई झालेली दिसते. सुपरस्टार रंजनीकांत च्या Jailer या चित्रपटापेक्षा Gadar 2 बॉक्स ऑफिस वर जास्त कमाई करत असलेले दिसून येते.
OMG -2 हा सिनेमा bollywood स्टार अक्षय कुमार व पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट आहे.हा चित्रपट सुद्धा चांगली कमाई करत असलेला दिसून येतो.हा चित्रपट लैंगिक शिक्षणावर आधारित असल्याने लोकांना या चित्रपटाचा विषय आवडत असून लोक चित्रपटाकडे आकर्षित होत आहेत.आतापर्यंत या चित्रपटाने ९०.६० कोटी इतकी कमाई केली असून कमाई चालू आहे.लवकरच हा चित्रपट १०० कोटीच्या पुढे जाईल असे वाटते.
आत्ताच अभिषेक बच्चन चा “घूमर” हा चित्रपट रिलीज झाला आहे. अगोदरच Gadar 2,Jailer, OMG-2 हे चित्रपट चांगली कमाई करत आहेत आणि त्यात घुमर ची भर पडली आहे.त्यामुळे घुमर कशी कमाई करेल याबाबत प्रेक्षक च सांगू शकतील.या चित्रपटाची ओपनिंग काहीशी निराशाजनक असल्याचे समजते.
हे ही वाचा
पळसखेड्यात रानातल्या कवितांची निसर्गसंपन्न लेणी कोरणारे आठवणीतील अजिंठ्याजवळचे कवी ना.धो.महानोर.
पाहूया शर्यत अजून संपलेली नाही. कोणता चित्रपट कोणत्या चित्रपटाला चितपट करतोय, हे पाहणे औत्सुक्याचा विषय आहे. वाट पाहणे हे प्रेक्षकांच्या हातात आहे फक्त.

Writer,Activenama