सांगली जिल्ह्यातील,जतमधील ६५ वर्षाच्या रामचंद्र मासाळनी केले वर्ल्ड रेकॉर्ड : लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली नोंद.

 फुले वाटणाऱ्यांच्या हाताला नेहमी फुलांचा सुगंध येत असतो, दुसऱ्यांना शुभेच्छा देणाऱ्या माणसांना खरंच काय बरं मिळत असेल असे सर्व साधारण कोणालाही वाटेल. दुसऱ्याचे चांगले इच्छिणाऱ्यांना ती सदिच्छा,शुभेछ्या परत येऊन ती देणाऱ्यालाही मिळते.जत मधील रामचंद्र मासाळ बाबतही असेच घडत आहे. फेसबुक वरील सर्वात जास्त कमेंट करणारे भारतातील व्यक्ती म्हणजेच भारतातील अशी व्यक्ती जी फेसबुक वर सर्वात जास्त कमेंट करणा- या व्यक्तीमध्ये प्रथम क्रमांकावर आली आहे ती व्यक्ती म्हणजे रामचंद्र मासाळ आहेत. भारतातील रेकॉर्ड नंतर आता परदेशात ही त्यांच्या नावाचा डंका वाजू लागला आहे. हे आपल्या भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

रामचंद्र मासाळ कोण आहेत ?

हे ही वाचा

विविध पात्रता,पदे,आरक्षण संपुर्ण तपशील काय आहेत जाणून घ्या. पनवेल महानगरपालिका ३७७ विविध जागासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.

असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडेल त्याबाबत आता आपण जाणून घेऊ या. रामचंद्र मासाळ हे मुळचे खलाटी च्या दक्षिणेला असलेल्या साळमळगेवाडी येथील आहेत.(जत तालुक्यातील) नोकरी निमित्त ते जत शहरांमध्ये स्थायिक झाले. त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या बस वर चालक म्हणून अनेक वर्षे नोकरी केली. त्यांच्या महामंडळाच्या बस वरील चालक म्हणून काम करत असतानाच्या कार्यकाळात , त्यांनी डिझेल कसे वाचवावे ? याबाबत लोकांना मार्गदर्शन केले व त्यांनी स्वतः चालक म्हणून डिझेल बचत केली. त्याबद्दल त्यांना परिवहन विभागाकडून पुरस्कारही मिळालेला आहे.

हे ही वाचा

Pan Card ला Aadhar Card शी लिंक कसे कराल ? जर करणे बाकी असेल तर आत्ताच करा.

           कर्नाटक व महाराष्ट्र मध्ये सर्वात लांब व मोठ्या मिशा वाल्याच्या स्पर्धा भरल्या होत्या. त्यातही त्यांना सर्वात लांब व मोठा मिशा असणारा व्यक्ती म्हणून पुरस्कार मिळाला आहे. दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे रामचंद्र मासाळ नेहमी आपल्या आवडीच्या कामात मनापासून रस घेऊन काम करतात.

          आज वयाची 65 वर्षे त्यांनी पूर्ण केली आहेत. ते एसटी खात्यातून स्वेच्छया निवृत्त होऊन बरेच वर्षे झाली आहेत, पण एखाद्या तरुणाला लाजवेल इतक्या सफाईदारपणे ते फेसबुक सारखे तंत्रज्ञान हाताळतात. हाताळत च नाहीत तर त्यांना भारतातील सर्वात जास्त कमेंट करणारे व्यक्ती म्हणून फेसबुकने सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.

ते फेसबुक कडे कसे वळले ?

हे ही वाचा

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा एकत्रित लाभाचा मोठा फायदा होणार | संपूर्ण योजना व माहिती.

         वर्षभरापूर्वी रामचंद्र मासाळ यांना मोबाईल सुद्धा हाताळता येत नव्हता,हळूहळू त्यांनी सर्व गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर फेसबुक त्यांच्या पाहण्यात आले. त्यावर खाते उघडून घेतले. तिथून सुरू झाला. रामचंद्र मासाळ यांच्या यशाचा प्रवास.

         एखाद्याचा वाढदिवस असला की ते त्यांना शुभेच्छा देतात, त्या फक्त  शुभेच्छा Happy birthday इतक्याच शुभेच्छा देत नाहीत तर जवळजवळ 25 ते 30 ओळी शुभेच्छा देतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला ही त्या शुभेच्छा आवडतात. तोही त्यांना फेसबुक वर रिप्लाय देतो अशाने रामचंद्र मासाळ यांचे नाव टॉप  कॉमेंटटेटर च्या लिस्टमध्ये वरवर येत गेले. 

          ते भारतातील फेसबुकचे टॉपर उपभोक्ते बनले. आता तर त्यांची “लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंद झाली आहे. तसे संपादनुकीचे (achievement) प्रमाणपत्र ही त्यांना प्राप्त झाले आहे. त्यांना विदेशामध्ये येण्याचे निमंत्रण ही मिळते पण वयोमानामुळे तिकडे जाण्यास ते असमर्थता दर्शवितात. रामचंद्र मासाळ यांना फेसबुक वर विदेशात “बर्थडे स्टार” म्हणून ओळखले जाते अजूनही बरेच पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

       आज वयाच्या 65 वर्षानंतरही ते आनंदाने जीवन जगतात. आजच्या पिढीच्या हातातील तंत्रज्ञान अवगत करून त्यात प्राविण्य मिळवणे इतके सोपे नसताना, त्यांनी ते शक्य केले. आज परदेशात भारताचे नाव मोठे करत रामचंद्र मासाळ यांनी सर्वांनाच थक्क केले आहे.

हे ही वाचा

Juice Jacking Scam कसा होतो ? या विषयी माहिती आपण घेऊ या !

       सरकारी सेवेत असताना ही त्यांनी आपले नाव कर्तुत्वाने उंचावलेले आहेच पण आज वार्धक्याचा काळ सुद्धा दुसऱ्याचे भले होऊ दे असे इच्छा व्यक्त करत ते आनंदाने जगत आहेत.

65 वर्षाचा भारतातील एक व्यक्ती परदेशात फेसबुक वर ‘बर्थडे स्टार’ म्हणून ओळखणे भारतासाठी अभिमानास्पद नक्कीच आहे.

          दुसऱ्यांना दिलेल्या शुभेच्छा,सदिच्छा कधीच व्यर्थ जात नाहीत त्या परत आपणास फिरून मिळत असतात हे खरंच आहे. यातून त्यांना अजूनही प्रेरणा मिळत असून ते यात अधिकच रमत आहेत. म्हणूनच जे लोक दुसऱ्यांना फुले वाटतात त्यांच्या हातात फुले नसतात, तरी त्यांना फुलांचा सुगंध येत असतो. माणसाचे कर्म ही असेच असावे लागते.

      रामचंद्र मासाळ यांना एकुलती एक मुलगी आहे जी रत्नागिरी येथे पोलीस दलात आहे. मुलीच्या करिअरसाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली होती.

      काहीही असो माणूस आनंद शोधणारा पाहिजे. आनंद हा कुठूनही मिळत राहतो, असेच रामचंद्र मासाळ यांच्या बाबत म्हणता येईल . रामचंद्र मासाळ यांचे उतार वय आनंदी,सुखमय जावो ,अशी ॲक्टिव्हनामा टीम कडून हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment