बुद्धिमत्ता ही बुद्धिमत्ता असते. ती ठराविक एकाच ठिकाणी कुठेही जन्माला येत नाही. ती शहर आणि खेडे, गरीब आणि श्रीमंत असा कधीच भेदभाव करत नाही. बुद्धिमत्तेलाच उमेदीची,कष्टाची इच्छाशक्तीची जर जोड मिळाली, तर अशक्य रांगेतील गोष्टही शक्य करता येते हे आकाश पोपळघट या खेड्यातल्या युवकाने दाखवून दिले. आज आपण वाचणार आहात आकाश पोपळघट याची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि संघर्ष. Success story of Aakash Popalghat
आकाश पोपळघट मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यात जन्मला. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचा धनी असलेल्या आकाश चे वर्गात कायम वर्चस्व राहिले. त्याच्याविषयी आपण का चर्चा करत आहोत तर त्याची किर्ती आणि कर्तुत्व आकाशाला गवसनी घालणारे आहे. 22 ओलंपियाड मध्ये आकाश पोपळघटने गोल्ड मेडल मिळवलेले आहे. त्याला “पृथ्वीरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.Success story of Aakash Popalghat
त्याला IEEA-excellence in education,Dubai पुरस्कार मिळालेला आहे. तो वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. 25 इंटरनॅशनल आणि नॅशनल मिळून त्याला 88 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. एमआयटी बोष्टन इथे त्याला शंभर टक्के शिष्यवृत्तीवर प्रवेश मिळालेला आहे. इतके मोठ कर्तुत्व करणाऱ्या आकाश बद्दल आपण अजूनही जाणून घेणार आहोत.Success story of Aakash Popalghat
दहावीला तो सामान्यपणे चार तास अभ्यास करत असायचा. राजस्थान मधील कोठा येथे असताना 12 ते 14 तास अभ्यास करायचा. आकाश पोपळघट याची गिनीज बुकात नोंद झाली आहे भारताचा सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून. ही गोष्ट नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची आहे.Success story of Aakash Popalghat
आकाश पोपळघट हा विद्यार्थी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील शेणगाव या छोट्याशा गावातला आहे.त्याचे आई वडील शेती करतात.
आकाश पोपळघट या विद्यार्थ्याचे प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. त्याच्या गावातली जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे तीन चार खोल्या असलेली शाळा होती. तिथे त्याच गावातले विद्यार्थी शिकत असत. काही गणवेशात येत काही बिगर गणवेशात येत अशी ती शाळा होती.Success story of Aakash Popalghat
पहिली ते चौथीपर्यंत चे शिक्षण त्याने तिथेच पूर्ण केले. याच काळात त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर संस्कार केले की प्रामाणिक पणाने व कष्टाने केलेले ते कायम टिकत असतं. हा विचार त्याच्या आई-वडिलांनी पहिली ते चौथीच्या वर्गात असताना रुजवलेला होता आणि तो संस्कार शेवटपर्यंत आकाश ने जपण्याचा प्रयत्न केला असे तो सांगतो.
आकाश पोपळघटने अनेक शैक्षणिक भाषणामध्ये सांगितलेलं आहे की, Education is a powerful weapon which brings a new chang in our personality. म्हणजे शिक्षण हे एक शक्तिशाली शस्त्र आहे जे आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडवून आणते. अभ्यास करायचा असतो. अभ्यासाने माणूस मोठा होतो. अभ्यास स्वतःसाठीच करायचा असतो असे आकाश पोपळघट चे वडील आई सांगत असायचे आणि तेच त्याने ऐकले.Success story of Aakash Popalghat
लहानपणापासून शाळेमध्ये हुशार असल्याने अभ्यासाची गोडी होती असे आकाश सांगतो. आकाश चे वडील शेती करतात आणि आई घर काम करते. त्याच्या वडिलांची पावणे दोन एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये आई वडील कष्ट करून कुटुंबाचे पालन पोषण करत होते. त्याच्या कुटुंबात पाच व्यक्ती आहेत. त्या पाच व्यक्ती मध्ये आई-वडील, भाऊ, आजी आणि आकाश यांचा समावेश होतो.
गावामध्ये एक हुशार आणि गुणवान विद्यार्थी म्हणून आकाशची ओळख होती. इयत्ता पाचवी पासून त्याने तालुक्याच्या ठिकाणी सेमी इंग्लिश माध्यमांमध्ये प्रवेश घेतला. त्याच्या आई-वडिलांनी परिस्थिती नसतानाही हे धाडस केलं आणि तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवले. त्याने भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रिसोड येथे प्रवेश घेतला. या शाळेमध्ये तो शिक्षकांशी मैत्रीपूर्ण वागला आणि त्याला ज्या समस्या येत होत्या त्या त्याने त्यांच्यामार्फत सोडवून घेतल्या. भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक रिसोड या शाळेचा त्याच्या यशामागे खूप मोठा वाटा आहे असे तो सांगतो. त्याच्या वरचे संस्कार, परिश्रम, संयम,बुद्धिमत्ता या गुणांनी त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवले असे म्हटले तर किंचितही वावगे होणार नाही.Success story of Aakash Popalghat
Writer,Activenama