वयाच्या 65 व्या वर्षी सांगली जिल्ह्यातील जतच्या रामचंद्र मासाळ यांचा विक्रम : बनले फेसबुक वर कमेंट करणारे भारतातील पहिल्या क्रमांकाचे व्यक्ती.

वयाच्या 65 व्या वर्षी सांगली जिल्ह्यातील जतच्या रामचंद्र मासाळ यांचा विक्रम : बनले फेसबुक वर कमेंट करणारे भारतातील पहिल्या क्रमांकाचे व्यक्ती.

अँड्रॉइड मोबाईल हे तंत्रज्ञान अलीकडच्या काही दशकात उदयाला आले आहे. त्यामुळे नवीन पिढीला हे तंत्रज्ञान बऱ्यापैकी अवगत झाले आहे, परंतु जुन्या पिढीला हे तंत्रज्ञान इतकं सोपं वाटत नाही. मोबाईल पिढीला हे जुन्या पिढीतील लोक बऱ्याच वेळा नावे ठेवतात. यांची कारणे वेगवेगळी आहेत, त्यापैकी एक कारण म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट ! जुन्या पिढीला जे अवगत नाही,येत नाही,म्हणून ते शिकण्याचा प्रयत्न न करता नव्या पिढीला मात्र स्वभावधर्मानुसार नावे ठेवायला मोकळे होतात . पण जुन्या पिढीतील काही लोक असेही आहे, ज्यांनी अलीकडच्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवलेले आहे.At the age of 65, Jat’s Ramchandra Masal of Sangli district’s record: became India’s number one commenter on Facebook

त्यापैकीच एक सांगली जिल्ह्यातील जत येथील रामचंद्र मासाळ. रामचंद्र मासाळ यांनी वयाच्या 65 व्या वर्षी फेसबुक वर सर्वाधिक कमेंट करणाऱ्या व्यक्ती म्हणून बहुमान मिळवला आहे. वर्षभरापूर्वी रामचंद्र मासाळ यांना अँड्रॉइड मोबाईल हाताळता सुद्धा येत नव्हता. नवीन शिकण्याची आवड आणि दुसऱ्यांना शुभेच्छा देण्याची आवड या दोन्ही गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडल्या आणि त्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यांना दुसऱ्यांना शुभेच्छा द्यायला खूप आवडते . त्यांना वाटते की आपण दुसऱ्यांना शुभेच्छा दिल्या की समोरच्या व्यक्तीला प्रेरणा मिळते, त्याच्या कामात प्रगती होते, आणि हे खरे सुद्धा आहे. म्हणून रामचंद्र मासाळ म्हणतात की, मी अशाच शुभेच्छा पुढेही देत राहीन.At the age of 65, Jat’s Ramchandra Masal of Sangli district’s record: became India’s number one commenter on Facebook

फेसबुक वर ते आठ ते वीस ओळीत शुभेच्छा देत असतात. अलीकडे त्यांना प्रसिद्ध व्यक्तीकडून सुद्धा रिप्लाय मिळत असतो. अशा या त्यांच्या दिनक्रमामुळे एक दिवस फेसबुक कडून त्यांना सूचना आली की, कमेंट करणाऱ्यांच्या रँक मध्ये तुम्ही भारतात तिसावे आहात. ही रँक सुधारत सुधारत गेली आणि फेसबुकच्या गुणांमध्ये सर्वाधिक 384 गुण मिळवून ते भारतातील व्यक्तीमध्ये प्रथम क्रमांकावर आले. यासाठी रामचंद्र मासाळ यांना फेसबुक ने शुभेच्छा दिल्या आहेत.

विशेष आहे ना ? जो व्यक्ती दुसऱ्यांना शुभेच्छा देतो, त्या व्यक्तीला चक्क फेसबुकने शुभेच्छा दिल्या आहेत.

रामचंद्र मासाळ या व्यक्तीचे व्यक्तिमत्व क्रूर, खुनशी, भयानक, गुंड प्रवृत्तीचे वरून जरी दिसत असले तरी माणूस म्हणून ते अतिशय प्रेमळ आहेत, दिलखुलास स्वभावाचे आहेत. या वयातही ते आनंदी राहतात. जसे नवे तंत्रज्ञान-जुने तंत्रज्ञान यांच्याशी ते समरस होतात तसेच ते विविध आचार-विचार असलेल्या व्यक्तीशी सुद्धा समरस होतात, मिसळतात. रामचंद्र मासाळ हे जत शहरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसवर चालक म्हणून कार्यरत होते. काही काळानंतर काही कारणामुळे त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सेवेत असतानाच्या काळात ही त्यांना महामंडळाकडून डिझेल वाचवल्याबद्दल पुरस्कार मिळालेले आहेत , त्याचबरोबर कर्नाटक व महाराष्ट्रात मिशी च्या स्पर्धांमध्ये  सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत . एसटी महामंडळाच्या सेवेत असताना कुणी त्यांना “मिशीवाले मासाळ” म्हणायचे तर कुणी गमतीने “वीरप्पन” असे म्हणायचे. रामचंद्र मासाळ हे जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथील मूळ रहिवाशी आहेत.

पुढे नोकरीनिमित्ताने ते जत शहरात स्थायिक झाले. त्यांची एकुलती एक मुलगी रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस दलात कार्यरत आहे. पूर्वीपासूनच चार चौघात उठून दिसणारे हे व्यक्तिमत्व आज 65 व्या वर्षी सुद्धा तसेच चार चौघात उठून दिसणारेच आहे.

म्हणूनच आजच्या तरुण पिढीच्या हातातील तंत्रज्ञान सुद्धा इतक्या प्रचंड इच्छाशक्तीने त्यांनी आत्मसात केले आहे. नुसते आत्मसातच केले नाही तर त्या तंत्रज्ञानातील एका घटकाबाबत ते देशात अव्वल ठरले आहेत. दुसऱ्यांना शुभेच्छा देऊन त्यांना प्रेरणा देणाऱ्या, अशा या जेष्ठ मासाळ “मामा” स आमच्याकडून सुद्धा त्यांना निरोगी जीवनासाठी, सुखी जीवनासाठी लाख लाख शुभेच्छा !!!!

Leave a Comment