शासन विविध घटकासाठी, विविध जनकल्याणकारी योजना नेहमी राबवत असते.त्यातीलच विद्यार्थ्यासाठी आखलेली ही एक कल्याणकारी योजना म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना होय.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत ही योजना आहे.एखाद्या विद्यार्थ्याचा अचानक अपघात झाला / जखमी झाला तर त्या विद्यार्थ्याच्या अपघातामुळे काही प्रमाणात का होईना नुकसान भरपाई मिळण्यासाठी या अनुदानाची योजना आहे.या योजनचेची संपुर्ण माहिती, योजनेची कार्यपद्धती, अंमलबजावणी संपुर्ण माहिती या ठिकाणी आपणास आज मिळणार आहे. Know complete information about Rajiv Gandhi Student Accident Relief Grant Scheme.
हे ही वाचा
कोण कोणाला भारी ? सुपरस्टार रंजनीकांत चा Jailer ? कि सनी देओल चा Gadar 2 जाणून घ्या.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
योजनेमध्ये खालील बाबींचा समावेश नाही
१) आत्महत्येचा प्रयत्न व आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे.
२) गुन्हयाच्या उद्देशाने कायदयाचे उल्लंघन करताना झालेला अपघात.
३) आमली पदार्थ सेवन केले असता झालेला अपघात
४) नैसर्गिक मृत्यू व मोटार शर्यतीतील अपघात.
विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान पुढील प्राधान्य क्रमाने मिळते.
१) विद्यार्थ्याची आई.
२) विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील
(३) आई-वडील हयात नसल्यास १८ वर्षावरील भाऊ किंवा अविवाहीत बहीण किंवा पालक
हे ही वाचा
सावधान ! मुंबईमध्ये बऱ्याच महिला सोबत असे घडत आहे ;असे होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल ? Scam | fraud
योजनेची कार्यपद्धती-
१) पात्र विद्यार्थ्याच्या पालकाने सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव ३ प्रतीत संबंधित मुख्याध्यापकामार्फत इयत्ता १ ली ते ८ वी व ९ वी ते १२ वी पर्यंतच्या मुला / मुली करिता अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना), जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावे. Know complete information about Rajiv Gandhi Student Accident Relief Grant Scheme.
२) बृहन्मुंबई शहराकरिता सदर प्रस्ताव संबंधित विभागाचे शिक्षण निरीक्षक (पश्चिम, उत्तर, दक्षिण) यांचेकडे पालकाने दाखल करावेत.
(३) अर्जाची छाननी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) / शिक्षण निरीक्षक यांनी करावी आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीपुढे निरीक्षक यांनी सादर करावी.
४) सदर समितीची बैठक आवश्यकतेप्रमाणे तथापि महिन्यातून किमान एकदा घेण्यात यावी.
५) समितीने प्रस्ताव नाकारल्यास संबंधित पालकांना लेखी स्वरुपात कारणासह कळवावे.
६) समितीने मंजूर केलेले प्रस्ताव शिक्षणाधिकारी(प्राथमिक/माध्यमिक/ योजना) / शिक्षण निरीक्षक यांच्या मार्फत शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे पाठवावेत.
७) शिक्षण संचालनालय (योजना) यांनी प्रस्तावाची रक्कम शासनाकडे मागणी करून घेऊन शिक्षणाधिकारी (योजना), यांचेकडे सुपुर्द करावी.
८) समितीने मंजूर केलेली प्रस्तावाची रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक यांनी संस्थेच्या मुख्याध्यापकांमार्फत एकाच हप्त्यात धनादेशाव्दारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सात दिवसात जमा करावी.
योजनेच्या अंमलबजावणी करीता आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, व शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/ योजना) / शिक्षण निरीक्षक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येते.
हे ही वाचा
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची माहिती मिळवण्यासाठी संपर्क
१) शिक्षणाधिकारी(प्राथमिक/माध्यमिक/योजना )जिल्हा परिषद
२)शिक्षण निरीक्षक (पश्चिम,उत्तर,दक्षिण)
3) संबंधित शाळांचे मुख्याध्यापक
योजनेचे नाव राजीव गांधी विद्याथी अपघात सानुग्रह अनुदान योजना उद्देश
या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना सुरक्षा कवच देवाकरिता राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण घेण्या-या सर्व विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात योजना शासन निर्णय दि. १ ऑक्टोबर २०१३ व सुधारित शासन निर्णय दि. २९ जून २०२२ नुसार सदर योजना राबविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
या योजनेची अंमलबजावणी राज्य शासनामार्फत केली जाते तसेच पात्र लाभाच्यांना मिळणारी रक्कम शिक्षणाधिकारी योजना यांच्यामार्फत दिली जाते.
हे ही वाचा
वीज मीटरला ही मोबाईल सारखे रिचार्ज करावे लागणार ?

हे ही वाचा
आता आपली आवडती स्प्लेंडर इलेक्ट्रिक अवतारात ; इतकी असणार किंमत.
१) विद्यार्थ्याची अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळून आर्थिक ताण कमी करणे.
२) एखादा विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबास आर्थिक स्थैर्य मिळणे.
३) विद्यार्थ्याला अपघातामुळे अपंगत्व आल्यास शस्त्रक्रियेचा होणारा खर्च मिळणे.
देव न करो कोणत्याही विद्यार्थ्यावर अशी वेळ येऊ नये,पण अशी वेळ आलीच तर या योजनेचा फायदा जरूर घ्यावा.ही संपुर्ण माहिती संग्रह म्हणून ठेवावी.

Writer,Activenama